Osmanabad जिल्ह्यात उमरगा ,शिराढोण , परंडा या 3 ठिकाणी मारहाण गुन्हे दाखल
पोलीस ठाणे, उमरगा: गंगाधार विठ्ठलराव पाटील, रा. हिप्परगाराव, ता. उमरगा हे 08 फेब्रुवारी रोजी 20.30 वा. सु. गावातील किराणा दुकानाकडे जात असतांना राजकीय वैमनस्यातून भाऊबंद- नागनाथ पाटील, श्रीकांत पाअील, व्यंकट पाटील, सुंदर पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांनी गंगाधर पाटील यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, कुऱ्हाडीचा तुंब्याने मारहाण केली. यात गंगाधर पाटील यांच्या डाव्या हाताचे व डाव्या पायाचे हाड मोडले आहे. अशा मजकुराच्या गंगाधर पाटील यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 325, 324, 323, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, शिराढोन: मंगरुळ येथील किसन बाबुराव कांबळे व शहाजी कांबळे या दोघांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन 06 फेब्रुवारी रोजी 16.00 वा. सु. मंगरुळ येथे नातेवाईक- विष्णु बब्रुवान पौळ, रार. सावरगांव (बोरी), ता. केज यांसह त्यांच्या पत्नीस दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या विष्णु पौळ यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, परंडा: शेखापुर, ता. भुम येथील बिरमल पांडुरंग हांगे, अनिल हांडे आणि बालाजी गायकवाड असे तीघे 09 फेब्रुवारी रोजी 21.30 वा. सु. मोटारसायकलवरुन आपल्या वस्तीतून जात होते. यावेळी भाऊबंद- 1)महेश हांडे 2)राजेश हांडे 3)दिपक हांडे 4)राहुल हांडे 5)साहेबराव हांडे 6)बाबुराव हांडे 7)उत्तमराव हांडे 8)बबन हांडे 9)निलेश हांडे या सर्वांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरून नमूद तीघांना लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, काठीने मारहाण करुन जखमी करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बिरमल हांगे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 324, 341, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.