Osmanabad जिल्ह्यात तामलवाडी , उमरगा या 2 ठिकाणी 3 अपघात - Accident
पोलीस ठाणे, तामलवाडी: अज्ञात वाहन चालकाने 22.12.2020 रोजी 21.40 वा. सु. तामलवाडी येथील उड्डान पुलावर निष्काळजीपणे वाहन चालवून ऑटो रीक्षा क्. एम.एच. 13 बीटी 7674 ला पाठीमागून धडक दिल्याने रिक्षा पलटला. या अपघातात ऑटो रीक्षातील कुंभारी, सोलापूर येथील प्रवासी- मधुकर गटय्या यन्नम हे मयत झाले तर प्रवलिक यन्नम, चंद्रा वंगा, रुपा वंगा, अवंतिका, सुजाता यन्नम यांसह ऑटो रीक्षा चालक- प्रभुलिंग पाटील हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर अज्ञात वाहनाचा अज्ञात चालक अपघातस्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या सुजाता यन्नम यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, उमरगा: कल्याणी भिमशा हडपत, रा. जागमा, ता. आळंद यांनी 08 फेब्रुवारी रोजी 17.30 वा. सु. उमरगा येथील बसस्थानक जवळील रस्त्यावर मोटारसायकल क्र. के.ए. 32 ईडब्ल्यु 8507 ही निष्काळजीपणे चालवून रस्त्याने पायी जाणाऱ्या विजयकुमार नागप्पा कमलापुरे, रा. किणी (सुलतान), ता. आळंद यांना समोरुन धडक दिली. या अपघातात विजयकुमार याचा डावा हात दोन ठिकाणी मोडला. अशा मजकुराच्या विजयकुमार कमलापुरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, तामलवाडी: मल्हारी खंडु सरवदे, रा. यमगरवाडी, ता. तुळजापूर यांनी दि. 29.10.2020 रोजी 14.00 वा. सु. निष्काळजीपणे मळणी यंत्र चालवल्याने बाजूस उभ्या असलेल्या शेत मालक- निलावती भगवान मारकड यांच्या साडीचा पदर मळणी यंत्रात अडकून त्या यंत्रात ओढल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- प्रकाश भगवान मारकड यांनी 10 फेब्रुवारी रोजी तामलवाडी पो.ठा. येथे अकस्मात मृत्यु क्र. 41 / 2020 च्या चौकशीत दिलेल्या लेखी निवेदनावरुन मल्हारी सरवदे यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.