Osmanabad जिल्ह्यात मुरुम , लोहारा , शिराढोण या 3 ठिकाणी अपघात

0


Osmanabad जिल्ह्यात मुरुम , लोहारा , शिराढोण या 3 ठिकाणी अपघात 

पोलीस ठाणे, लोहारा: अज्ञात चालकाने 08 फेब्रुवारी रोजी 22.00 वा. सु. लोहारा (बु.) शिवारातील शेत रस्त्यावर क्रुझर वाहन क्र. एम.एच. 13 एसी 8069 ही निष्काळजीपणे, हयगईने चालवून रस्त्याने पायी जाणाऱ्या 1)शेखर जनार्दन मुर्टे, रा. लोहारा (बु.) 2)परमेश्वर पांडुरंग गुंड, वय 30 वर्षे, रा. कास्ती (बु.), ता. लोहारा यांना समोरुन धडक दिली. या अपघातात परमेश्वर गुंड हे मयत होउन शेखर मुर्टे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नमूद अज्ञात चालक अपघातस्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या जनार्दन राम मुर्टे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, मुरुम: अज्ञात चालकाने मो.सा. क्र. एम.एच. 25 एटी 9301 ही 01 फेब्रुवारी रोजी 16.20 वा. सु. जेवळी- आष्टामोड रस्त्यावर निष्काळजीपणे चालवल्याने त्या मोटारसायकलची समोरुन येणाऱ्या मोटारसायकल क्र. एम.एच. 25 जे 8958 ला धडक झाली. या अपघातात समोरील मो.सा. चालक मोहन टोपा राठोड, रा. मुरुम, ता. उमरगा हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या मोहन राठोड यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, शिराढोन: विद्युत दिवा, परावर्तक पट्ट्या न लावलेले ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एच 4414 व ट्रेलर क्र. एम.एच. 25 एई 4251 हे अज्ञात चालकाने नायगाव- बोरगावा रस्त्यावर निष्काळजीपणे उभे केले होते. 02 फेब्रुवारी रोजी 21.00 वा. सु. रस्त्यावरुन जाणाऱ्या मुरुड, जि. लातूर येथील रहिवासी रफीक पाशामिया शेख यांना तो ट्रेलर अंधारात न दिसल्याने त्यांची मो.सा. ट्रेलरला पाठीमागून धडकली. या अपघातात रफीक शेख यांच्या जबड्याचे हाड मोडून ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या रफीक शेख यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 237, 337, 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top