google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 Osmanabad जिल्ह्यात 3 ठिकाणी चोरी : गुन्हे दाखल

Osmanabad जिल्ह्यात 3 ठिकाणी चोरी : गुन्हे दाखल

0


Osmanabad जिल्ह्यात 3 ठिकाणी चोरी : गुन्हे दाखल

पोलीस ठाणे, उमरगा: नरसिंग सुर्यभान मुगळे, रा. मळगीवाडी, ता. उमरगा यांनी त्यांची हिरो होंडा पॅशन मोटारसायकल क्र. के.ए. 39 एच 6397 ही 06 फेब्रुवारी रोजी आरोग्यनगरी, उमरगा येथील सागर मेडीकलच्या बाजूस लावली असता 10.30 ते 12.30 दरम्यान अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या नरसिंग मुगळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, उमरगा: राजाराम बाबुराव बिराजदार, रा. उमरगा यांचा कोरेगांव तळ्यावरील कृष्णा कंपनीचा 5 अश्वशक्ती क्षमतेचा पाणबुडी विद्युत पंप 06 ते 07 फेब्रुवारी दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेला. अशा मजकुराच्या राजाराम बिराजदार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, आंबी: शेळगांव, ता. परंडा येथील स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्राचे चालक- रत्नाकर रघुनाथ कोल्हे यांनी 07 फेब्रुवारी रोजी 15.00 वा. सु. स्मार्टफोन टेबलवर ठेवलेला असतांना अज्ञाताने कोल्हे यांच्या नकळत तो स्मार्टफोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या रत्नाकर कोल्हे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top