उस्मानाबाद जिल्ह्यात 2 ठिकाणी मारहाण : गुन्हा दाखल
पोलीस ठाणे, आनंदनगर: ‘आई लॉन्स’ परिसरातील ‘श्री कॉफी शॉप’ चे चालक अक्षय पांडुरंग शेरकर, रा. उस्मानाबाद हे 06 फेब्रुवारी रोजी 16.00 वा. आपल्या दुकानासमोर उभे असतांना जुन्या संघर्षातून उस्मानाबाद येथील गणेश जाधव याने त्यांच्या पाठीमागून अचानकपणे येउन त्यांना लोखंडी नळीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या शेरकर यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, परंडा: नालगांव, ता. परंडा येथील विलास करळे व अविनाश करळे या दोघां भावांच्या कुटूंबात 07 फेब्रुवारी रोजी गावातील शेतात ऊसकापणी व शेतात पाणी सोडल्याच्या कारणावरुन वाद झाला. यात दोन्ही कुटूंबातील स्त्री- परुष सदस्यांनी परस्परविरोध गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. यावरुन दोन्ही गटांतील सदस्यांनी दिलेल्या 2 स्वतंत्र प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.