Osmanabad जिल्ह्यात 4 ठिकाणी जुगार विरोधी कारवाया
उस्मानाबाद जिल्हा: उस्मानाबाद पोलीस दलाने 27 फेब्रुवारी रोजी जुगार खेळणाऱ्यांविरुध्द कारवाई करुन जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करुन महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत खालीलप्रमाणे 7 गुन्हे नोंदवले आहेत.
1)त्रिकोळी, ता. उमरगा येथील जाधव किराणा दुकानाजवळ उमरगा पो.ठा. च्या पथकाने छापा टाकला असता त्रिकोळी येथील शशिकांत सुरवसे, विनायक पाटील, हिराकांत मिरगाळे, दिगंबर मोरे, हणमंत मुगळे, दादाराव सुरवसे, केशव कांबळे, दिपक कुन्हाळे, महेश वाडीकर, संजय मिरगाळे, बळीराम दुधभाते, हरी गाडे, आप्पाराव सुरवसे असे 13 जण चक्री जुगार खेळत असतांना जुगार साहित्य, स्मार्टफोन, रोख रक्कम असा एकुण 35,870 ₹ मालासह पथकास आढळले.
2)काक्रंबा, ता. तुळजापूर येथील कृष्णाथ तानाजी क्षिरसागर व शाहुराज भिमराव पांडगळे हे दोघे अनुक्रमे गावातील बसस्थानकाजवळ व जैन औषधालयाजवळ कल्याण मटका जुगार व मिलन नाईट मटका असे एकत्रीत जुगार साहित्य व 8,710 ₹ रोख रक्कम बाळगलेले तर वासुदेव गल्ली, तुळजापूर येथील बंडु माणिक इगवे हे तुळजापूर येथील येवले हॉटेल समोर कल्याण मटका जुगार साहित्य व 1,860 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले.
3)तडवळा (क.), ता. उस्मानाबाद येथील सोमनाथ उत्तरेश्वर पवार व आबासाहेब निवृत्ती हिंगे हे दोघे गावातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रीत कल्याण मटका जुगार साहित्य व 700 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळले.
4)दहीफळ, ता. कळंब येथील सुरेश भातलवंडे, शिवकुमार मुळे, श्रीकांत जोगदंड, नानासाहेब भातलवंडे, रवी भातलवंडे असे 5 जण मिळुन गावातील खंडोबा मंदीराजवळ तिरट जुगार साहित्यासह एक भ्रमणध्वनी व 420 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना येरमाळा पोलीसांना आढळले.