Osmanabad जिल्ह्यात 5 ठिकाणी मारहाण गुन्हा दाखल

0



Osmanabad जिल्ह्यात 5 ठिकाणी मारहाण गुन्हा दाखल 

पोलीस ठाणे, तामलवाडी: तामलवाडी पो.ठा. हद्दीतील एका गावातील एक 23 वर्षीय महिलेस तीचा पती मद्यधुंद अवस्थेत नेहमी त्रास देत असल्याने ती महिला आपल्या माहेरी येउन राहिली. 26 फेब्रुवारी रोजी 21.15 वा. सु. ती महिला आपल्या आईसह घरी असतांना तीच्या पतीने आपल्या मित्राच्यासह त्यांच्या घरात घुसुन आपल्या पत्नीस शिवीगाळ करुन त्या मद्यपी पतीने आपल्या पत्नीच्या अंगावर डिझेल टाकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या संबंधीत महिलेने 27 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 452, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): वैरागनागा, फकीरानगर, उस्मानाबाद येथील बाळासाहेब ज्ञानदेव पेठे हे 25 फेब्रुवारी रोजी 22.00 वा. सु. राहत्या गल्लीतील सार्वजनिक शौचालयासमोर थांबले होते. यावेळी गल्लीतीलच- बालाजी थोरबोले, पप्पु थोरबोले, अतुल थोरबोले या तीघांनी पुर्वीच्या भांडणावरुन बाळासाहेब पेठे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. बाळासाहेब यांच्या बचावास आलेल्या त्यांची आई, पत्नीसही नमूद तीघांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या बाळासाहेब पेठे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, तामलवाडी: माळुंब्रा, ता. तुळजापूर येथील रमेश व नंदकुमार रमेश वाघमारे हे दोघे पिता- पुत्र 26 फेब्रुवारी 15.30 वा. सु. गावातील आपल्या केश कर्तनालय दुकानात होते. यावेळी नमूद पिता- पुत्रांनी गावकरी- शुभम दत्तात्रय वडणे यांना केश कर्तनाचे पैसे मागीतले असता शुभम यांनी चिडुन जाउन त्या दोघांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर शुभमचा मित्र सचिन शशिकांत कुटार याने नंदकुमार यांच्या डोक्यात बतईने वार करुन जखमी केले. तसेच केशकर्तन दुकानावर दुकानासमोरील मोटारसायकलवर दगड मारुन नुकसान केले. अशा मजकुराच्या नंदकुमार वाघमारे यांनी 27 फेब्रुवारी रोजी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 506, 427, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): गणेशनगर, उस्मानाबाद येथील कल्याण भानुदास सर्जे हे रिक्षा चालक असुन 27 फेब्रुवारी रोजी गल्लीतील मसुबा चौकातील रिक्षा स्थानक येथे होते. यावेळी गल्लीतीलच- अजय नाईकवाडी यांनी आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन कल्याण सर्जे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, हातातील कड्याने मारहाण करुन जखमी करुन “तु रिक्षा कसा चालवतोस तेच बघतो.” अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या कल्याण सर्जे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, वाशी: केळेवाडी, ता. वाशी येथील सचिन एकनाथ लकडे व लक्ष्मण केळे हे दोघे 12 फेब्रुवारी रोजी 15.45 वा. सु. वाशी येथील अन्नपुर्णा मंगलकार्यालय- नवीन बसस्थानक रस्त्याने पायी जात होते. यावेळी गावातीलच- महारुद्र केळे, महाजन केळे, सचिन केळे, मोहन केळे, रेवण केळे, कृष्णा थोरात असे 6 जण 3 मोटारसायकलवर येउन त्या दोघांसमोर मोटारसायकली आडव्या लाउन, “तु दत्ता काळे याचे भाडे करत जाउ नकोस.” असे म्हणुन सचिन व लक्ष्मण यांना शिवीगाळ केली. तसेच ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी गज, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. या मारहाणीत महारुद्र व महाजन या दोघांनी सचिन लकडे यांच्या सदऱ्याच्या खिशातील 5,000 ₹ रक्कम व गळ्यातील 10 ग्रॅम सोन्याची चैन जबरीने काढून घेतली. अशा मजकुराच्या सचिन लकडे यांनी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वाशी येथे दिलेल्या तक्रारीवरुन न्यायालयाच्या आदेशावरुन भा.दं.सं. कलम- 395, 307, 147, 148, 149, 326, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा वाशी पो.ठा. येथे नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top