Osmanabad जिल्ह्यात 6 ठिकाणी चोरी : गुन्हे दाखल
पोलीस ठाणे, बेंबळी: चिखली, ता. उस्मानाबाद येथील पंडीत प्रल्हाद जाधव यांनी राहत्या घराच्या मागील पत्रा शेडमध्ये ठेवलेली 8 पोती सोयाबीन अज्ञाताने 28 ते 29 जानेवारी दरम्यानच्या रात्री चोरुन नेली. अशा मजकुराच्या पंडीत जाधव यांनी 06 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): दिपकनगर तांडा, ता. तुळजापूर येथील विद्यानंद मनोहर राठोड यांच्या बावी गट क्र. 212 मधील बंद शेडचे कुलून अज्ञाताने 01 ते 02 फेब्रुवारी दरम्यानच्या रात्री तोडून आतील विद्युत मीटर, वायर, एलसीडी, डीव्हीआर, वायफाय, पाण्याचे जार 9 नग, लिक्वीड कॅन 2 नग असा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या विद्यानंद राठोड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुने भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा 06 फेब्रुवारी रोजी नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, आनंदनगर: बार्शी नाका, उस्मानाबाद येथील साई ईस्पीतळ इमारतीवरील इंन्डस टायर कंपनीच्या मनोऱ्याच्या खालील खोलीतील 12 मिटर वायर व एक बॅटरी असा माल 05- 06 फेब्रुवारी दरम्यानच्या रात्री पाननाशनगर येथील एका परिचीताने चोरुन नेल्याचा संशय पर्यवेक्षक- महादेव ढवण, रा. खंडाळा, ता. तुळाजापूर यांचा आहे. यावरुन महादेव ढवण यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, तुळजापूर: संदीप उमाकांत म्हेत्रे, रा. सारोळा, ता. तुळजापूर हे 21 ते 22.09.2020 दरम्यानच्या रात्री आपल्या राहत्या घरी दरवाजा पुढे करुन झोपले होते. यावेळी दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेउन अज्ञाताने म्हेत्रे यांच्या उशाला असलेला त्यांचा रेडमी स्मार्टफोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या संदीप म्हेत्रे यांनी 06 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, कळंब: डिकसळ, ता. कळंब येथील आण्णासाहेब बाळासाहेब बोधले यांच्या डिकसळ गट क्र. 24 मधील शेत विहिरीवरील सौरपंपाची प्लेट व ॲडेस्ट रॉड असा माल 27 ते 28 जानेवारी दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेला. अशा मजकुराच्या आण्णासाहेब बोधले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, तुळजापूर: नजीर शैबी मुलाणी, रा. तुळजापूर यांच्या सरडेवाडी गट क्र. 119 मधील पाजर तलावावर बसविलेले किर्लोस्कर कंपनीचे 10 अश्वशक्ती क्षमतेचे इंजिन 29 ते 30.11.2020 दरम्यानच्या रात्री वडगाव (लाख) येथील एका परिचीत व्यक्तीने चोरुन नेल्याचा त्यांचा संशय आहे. अशा मजकुराच्या नजीर मुलाणी यांनी 06 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.