Osmanabad शहरात अपघात : धडकेत 1 व्यक्तीचा मृत्यू !

0


उस्मानाबाद शहरात अपघात : धडकेत 1 व्यक्तीचा मृत्यू !


उस्मानाबाद -  कैलास देवगिरी गोसावी, वय 35 वर्षे, रा. बसवकल्याण, राज्य- कर्नाटक यांचा ट्रक क्र. ए.पी. 16 टीपी 1819 हा 05 फेब्रुवारी रोजी 02.52 वा. सु. उस्मानाबाद येथील एमएच 25 फुटमॉलसमोरील पर्यायी मार्गावर नादुरुस्त झाल्याने ते ट्रक दुरुस्ती करत हाते. दरम्यान अज्ञात वाहनाच्या अज्ञात चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून कैलास गोसावी यांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरुन वाहनासह पसार झाला. यावरुन आनंदनगर पो.ठा. चे पोलीस नाईक- बब्रुवान बेडके यांनी सरकातर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत शहरातील आनंद नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top