स्थानिक गुन्हे शाखा: स्था.गु.शा. चे पोनि- श्री गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोउपनि- श्री पांडुरंग माने, भुजबळ, सपोफौ- खोत, पोना- महेश घुगे, हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- अविनाश मरलापल्ले, आरसेवाड, टेळे यांचे पथक जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांचा माग काढत असतांना पथकास गोपनीय खबर मिळाली की तिर्थ (खुर्द), ता. तुळजापूर येथे राहणाऱ्या राजा देवीदास भोसले, वय 21 वर्षे हा चोरीचे मोबाईल फोन बाळगून आहे. यावरुन पथकाने त्यास काल 6 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेउन विचारपुस केली असता पथकाने त्याच्या ताब्यातून तुळजापूर पो.ठा. गु.र.क्र. 45 / 2021 या चोरीच्या गुन्ह्यातील रेडमी स्मार्टफोन आणि नळदुर्ग पो.ठा. गु.र.क्र. 335/2020 चोरीच्या गुन्ह्यातील विवो स्मार्टफोन जप्त केला. तसेच तुळजापूर पो.ठा. गु.र.क्र. 183/2020 या चोरीच्या गुन्ह्यात त्याचा सहभग असल्याचा निष्पन्न झाल्याने पुढील कार्यवाहिस्तव त्यास तुळजापूर पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.
Osmanabad : चोरीच्या 2 गुन्ह्यांतील 2 स्मार्टफोनसह 1 आरोपी ताब्यात
फेब्रुवारी ०७, २०२१
0
अन्य ॲप्सवर शेअर करा