डॉ.चंद्रकांत तांबे यांचा सत्कार,परीक्षा मंडळाच्या प्रश्नपेढी समितीवर डॉ,चंद्रकांत तांबे यांची निवड

0

तुळजापूर :-  यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाचे गणित विषयाचे प्राध्यापक डॉ. चंद्रकांत तांबे यांची  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या  बारावी प्रश्नपेढी समितीवर  निवड झाल्याबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलेल्या सत्कार प्रसंगी प्राचार्य डॉ. मोहन बाबरे, उपप्राचार्य डॉ. एन. बी.जाधव, जुनिअर विभाग उपप्राचार्य प्रा रमेश नन्नवरे, प्रा अमर भरगंडे, प्रा राजेंद्र खेंदाड, प्रा. इंगळे, प्रा. विवेकानंद कुंभार,  प्रा.अमोल जोशी, प्रा दत्तात्रय देवगुंडे, प्रा सत्‍यवान मुसळे यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते. लातूर विभागीय मंडळामध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या डॉ. डॉक्टर चंद्रकांत तांबे यांच्या अभिमानास्पद निवडीबद्दल संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यानिमित्ताने प्राचार्य डॉ. मोहन बाबरे, उपप्राचार्य प्रा. रमेश नन्नवरे यांनी त्यांचे अभिनंदन
 केले,  तर उपप्राचार्य एन.बी. जाधव यांनी आभार मानले.

बातमी संकलन :-  रूपेश डोलारे , तुळजापूर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top