कळंब :- येथील विद्याभवन हायस्कूल येथे खाजगी शिक्षण सेवा सेवकांची सहकारी पतसंस्था म.कळंब या संस्थेचे चेअरमन शरद खंदारे व व्हाईस चेअरमन हनुमंत कोठावळे यांनी राजीनामा दिल्यामुळे नवीन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अरविंद शिंदे यांची चेअरमन म्हणून तर सुरेश टेकाळे यांची व्हाईस चेअरमन म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली .या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी म्हणून पुरी एस. के. उपस्थित होते. यावेळी संचालक संजय आडणे, धनंजय मडके, श्रीमती सरला खोसे, सुनील बारकुल, राजेंद्र नखाते, चंद्रसेन जगताप, अरुण गरड ,संतोष नागटिळक , सचिव नागेंद्र राऊत उपस्थित होते .नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा चे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांनी केले. नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार शरद खंदारे , हनुमंत कोठावळे तसेच सर्व संचालक मंडळाने केला.
खाजगी शिक्षक सेवकांची सहकारी पत संस्थेच्या चेअरमन पदी अरविंद शिंदे तर व्हाईस चेअरमनपदी सुरेश टेकाळे
मार्च २७, २०२१
0
अन्य ॲप्सवर शेअर करा