तुळजापूर ( Tuljapur ) शहरातील पुर्वीच्या कचराकुंड्या , शौचालये व मुतारी पाडून गैरसोय निर्माण करणारे अधिकारी व नगरसेवकांची योग्य ती चौकशी , कार्यवाही करण्याची मनसेची मागणी
Tuljapur :- तुळजापूर शहरातील पुर्वीच्या कचराकुंड्या , शौचालये व मुतारी पाडून गैरसोय निर्माण करणारे अधिकारी व नगरसेवकांची योग्य ती चौकशी करुन कार्यवाही करण्याबाबत तुळजापूर तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने ( MNS - Tuljapur )
निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातच तिर्थक्षेत्र तुळजापूर नगरी ही गैरसोयीचे माहेरघर बनले आहे . हे खेदाने नमूद करावेसे वाटते . तुळजापूर शहराची लोकसंख्या साधारण ३५ ते ४० हजार असून येथे दररोज कमीतकमी साधारण ४० ते ५० हजार भाविकभक्त देवि दर्शनास येत असतो , त्या सर्व भाविकांना , स्थानिक व्यापा-यांना व नागरिकाना अत्यावश्यक सोयीसुविधा देण्याचे कर्तव्य हे नगर पालिकचे असून त्याकडेच मोठ्याप्रमाणात दुर्लक्ष झालेले दिसून येते .
तुळजापूर शहरात कुठल्याही वार्डात फिरले तर प्रथमदर्शनी कुठे ही स्वच्छ सुलभ शौचालय , कचराकुंडी व मुलारी दिसून येत नाही . प्रत्येक नगरसवकाने आपल्या व आपल्या नातेवाईकांच्या घरासमोरील पूर्वी असणाऱ्या वरील अत्यावश्यक कचराकुंडी , शौचालय व मृताऱ्या बिनापरवाना पाडून टाकल्या आहेत . याबाबतची चौकशी केली तर उडवाउडवीचे उत्तरे नगर परिषदेकडून दिली जातात . नगर परिषदेने पूर्वीच्या ठिकाणी व नविन ठिकाणी ही या सुविधा पुरविताना दिसून येत नाही त्यामुळे येथे येणान्या देभिभक्ताची , नागरिकांची व व्यापाऱ्याची मोठया प्रमाणात हाल होताना दिसून येत आहे . तरी मे.साहेबांनी तात्काळ या निवेदनाची दखल घेऊन प्रत्येक वार्डात नगरसेवकांच्या वशीला न पाहता आवश्यक तेथे सर्व करून वरील सर्व सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात अन्यथा या मुलभूत गरजेकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिव्र आंदोलन करेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या वतीने तहसीलदार तुळजापूर यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनावर मनसे जिल्हा सचिन सुरज कोठावळे , उमेश काबळे , आक्षय साळवे, प्रमोद कदम ( परमेश्वर ) , झुबळ काळदाते ईत्यादीच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत