Osmanabad जिल्ह्यात 4 ठिकाणी अपघात गुन्हा दाखल
पोलीस ठाणे, येरमाळा: पैठण (देव), ता. जामखेड, जि. अहमदनगर येथील अशोक पंढरीनाथ सरगर, वय 50 वर्षे हे 06 मार्च रोजी 17.25 वा. सु. रत्नापुर शिवारातील बांगर हॉटेल समोरील महामार्गावर होते. यावेळी एका अज्ञात चालकाने कार निष्काळजीपणे चालवून अशोक सरगर यांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर संबंधीत कारच्या चालकाने अपघातस्थळावरुन कारसह धूम ठोकली. अशा मजकुराच्या समाधान वाघमारे, रा. पैठण (देव) यांनी 07 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 338 आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, तुळजापूर: आंबेवाडी, ता. उस्मानाबाद येथील विमल सोमनाथ क्षिरसागर या आपल्या मुलीसह दि. 25.02.2021 रोजी 18.00 वा. सु. मंगळवार पेठे, तुळजापूर येथील रस्त्याने पायी जात होत्या. यावेळी तुळजापूर येथील मयुर धनंजय कदम यांनी मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एजी 1678 ही निष्काळजीपणे चालवून विमल क्षिरसागर यांना पाठीमागू धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
पोलीस ठाणे, आनंदनगर: अज्ञात चालकाने दि. 27.02.2021 रोजी 19.30 वा. सु. युनियन बँकेसमोरील रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 13 डीएल 1482 ही निष्काळजीपणे चालवून बाबुराव तुळशिराम माने हे चालवत असलेल्या मो.सा. क्र. एम.एच. 25 एजी 4408 ला पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या बाबुराव माने यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या फिर्यादीवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, लोहारा: लिंबाळा, ता. औसा येथील शिवाजी केशव जाधव हे दि. 18.02.2021 रोजी सास्तुर येथील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 13 डीएन 2590 ही चालवत जात होते. यावेळी त्यांनी निष्काळजीपणे चुकीच्या दिशेने मो.सा. चालवून समोरील मो.सा. ला धडक दिली. या अपघातात शिवाजी जाधव यांच्या पाठीमागे बसलेल्या पिंटू थीरु चव्हाण, रा. दाळींब, ता. उमरगा यांच्या मांडीचे हाड मोडले व उपचारादरम्यान पायाची दोन बोटे काढून टाकावी लागली. तसेच या अपघातात समोरील मो.सा. वरील दोघे प्रवासी जखमी झाले. अशा मजकुराच्या पिंटु चव्हाण यांनी उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.