सांगवी (का) प्रतिनिधी
तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथे असणाऱ्या पोलिस स्टेशन मध्ये १४एप्रिल२०२१रोजी विश्वरत्न ,भारतरत्न, महामानव, परमपूज्य ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन पंडित, पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले, शिवसेना माजी विभागीय अध्यक्ष मुकुंदराव गायकवाड, तामलवाडी पत्रकार संघाचे सचिव प्रभाकर जाधव, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब रणसुरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले . तर सामाजिक अंतर ठेवून सिद्धेश्वर मसुते यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे थोडक्यात जीवन चरित्रविषयी माहिती दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुलेमान शेख , किसन पांडागळे ,पोलीस कर्मचारी प्रदीप ओहाळ ,गोरोबा गाढवे , आकाश सुरणर, सोमनाथ भालेकर , करीम शेख, पवन नागरगोजे ,महिला पोलीस ठाणे अंमलदार वैशाली कोरे साळू कुडवे , तबस्सुम तांबोळी यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


