सांगवी का, प्रतिनिधी (भिमा भुईरकर)
तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) येथे कोरोना रुग्ण आढळून आल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व गावांमध्ये सोडियम हायपोक्लोराइड या जंतुनाशक रसायनाची फवारणी ट्रॅक्टरद्वारे संपूर्ण गावांमध्ये व वाडीववस्तीवर करण्यात आली
यावेळी गावातील नागरिकांना घरीच राहून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क लावणे, वारंवार साबणाने हात धुणे, स्यानी टाययझर चा वापर वारंवार करणे,सामाजिक अंतर राखणे, अशा विविध गोष्टींचे पालन करून ग्रामपंचायतीस सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी गावचे उपसरपंच मिलिंद मगर, गावचे पोलीस पाटील महेश रोकडे, आशा ताई अर्चना उमेश मगर ,अंगणवाडी सेविका सुनंदा मगर, पूजा रघुनाथ मगर, ओंकार मगर, विनोद मगर, कोरोना साह्यता कक्षाचे प्रमुख कविटकर सर, ग्रामपंचायत शिपाई रघुनाथ मगर, ग्रामपंचायत पाणीपुरवठा शिपाई महादेव माळी , यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.
या उपक्रमासाठी विशेष सहकार्य बालाजी अमाईन्स लिमिटेड तामलवाडी. व विनोद मगर यांचे लाभले


