पालकमंत्री शंकरराव गडाख व अमित विलासराव देशमुख यांचा जिल्हा दौरा
Osmanabad : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख हे उद्या दिनाक.19 एप्रिल 2021 रोजी उस्मानाबाद ( Osmanabad ) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत . जिल्हा रुग्णालयास आणि ऑक्सिजन प्लांटला भेट देऊन पाहणी करणार आहेत . येथेच पालकमंत्री श्री . गडाख उपस्थित डॉक्टर आणि पत्रकारांशी चर्चा करणार आहेत. पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा कोरन्टाईनचा कालावधी आजच ( 18 एप्रिल रोजी ) संपला आहे.
राज्याचे वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख हे उद्या दि .19 एप्रिल 2021 रोजी उस्मानाबाद ( Osmanabad ) जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत . त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे . श्री . देशमुख ऊस्मानाबाद जिल्हा कोवीड संबंधी आढावा बैठक घेतील जिल्हा प्रस्तावित शासकिय वैद्यकिय महाविद्यालय जागेची जिल्हा रूग्णालय परिसरात पाहणी करुन पत्रकार परिषदेस समबोधित करतील अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालय कडून देण्यात आली आहे


