google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 माकणीमध्ये संस्थात्मक विलगिकरन सेंटरचे उद्घाटन

माकणीमध्ये संस्थात्मक विलगिकरन सेंटरचे उद्घाटन

0

लोहारा  / प्रतिनिधी

 लोहारा तालुक्यातील माकणी येथील बी.एस.एस. महाविद्यालयात "संस्थात्मक विलगिकरन" करन्यासाठी संपुर्ण तयारी झाली असून यांचे उद्घाटन करण्यात आले.
- सध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह येथील CCC (कोविड केअर सेन्टर) तसेच ITI कॉलेज लोहारा येथील CCC मधेही बेड मिळणे दुरापास्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
- या परिस्थितीला अनुसरून लोहारा तालुक्यातील माकणी ग्रामपंचायत तसेच प्रा आ केंद्र, माकणी यांनी सदर उपक्रम हाती घेतला व संपूर्ण तयारीसह दि 28 एप्रिल रोजी  उद्घाटन करण्यात आले.
- उद्घाटन प्रसंगी मा. तहसीलदार, श्री संतोष रुईकर, मा. गटविकास अधिकारी, श्री सोपान अकेले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक कटारे, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे व्यवस्थापक मा. रमाकांत जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ माने मॅडम, समुदाय आरोग्य अधिकारी, डॉ संतोष मनाळे हे अधिकारी तर ग्रामपंचायत सरपंच, मा. विठ्ठल साठे, उपसरपंच, मा श्री वामन भोरे तसेच मा. श्री किशोर साठे, मा. श्री ज्ञानदेव सुरवसे, मा. श्री दादा मुळे, मा. श्री दादा जानकर, मा. श्री सरदार मुजावर, मा. श्री विश्वनाथ पत्रिके आदी मान्यवर उपस्थित होते.
- ग्रामीण भागात स्वतंत्र खोली, स्वच्छतागृह, प्रसाधनगृह अशी सुविधा बऱ्याचदा उपलब्ध नसते. त्यामुळे गृहवीलगिकरन केले असता कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा होऊ शकते तसेच काही रुग्ण गृहवीलगिकरन घेऊन बाहेर पडले तर इतर नागरिकांना बाधा होऊ शकते. त्याअनुषंगाने संस्थात्मक विलगिकरन हा उत्तम पर्याय होऊ शकतो.

- माकणी येथील कॉलेजमध्ये सध्या एकूण २५ रुग्णांना ठेवण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
- पॉझिटिव्ह आलेला प्रत्येक रुग्ण हा आधी CCC लोहारा येथे दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर रुग्णाचे रक्ताचे रिपोर्ट नॉर्मल असतील, OXYGEN चे प्रमाण नॉर्मल असेल तसेच कोविड ची लक्षणे नसतील व प्रकृती स्थिर असेल अश्याच रुग्णांना संस्थात्मक विलगिकरनामधे ठेवण्यात येणार आहे.
- येत्या आठवड्यात जेवळी, कानेगाव तसेच आष्टा कासार या प्रा आ केंद्र असणाऱ्या गावांमध्ये असे संस्थात्मक विलगिकरन सेंटर स्थापन करण्याचे नियोजन सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top