वैराग रोड प्राथमिक आरोग्य केंद्रात तासनतास रुग्णांना थांबावे लागत आहे उन्हात!
उस्मानाबाद :- शहरातील वैराग रोड वरील प्राथमिक नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रात ( रुग्णालयात ) उन्हा मुळे रुग्णाचे प्रचंड हाल होत आहेत. उस्मानाबाद शहरातील दाट वस्तीच्या भागात असलेले वैराग रोड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रोज दोनशे ते अडीचशे रुग्ण वेगवेगळ्या प्रकाराचे तपासणीसाठी येतात व या ठिकाणी कोविड -19 रुग्ण देखील तपासणीसाठी येत आहेत व या ठिकाणी कोविंड लसीकरण केंद्र असल्याने व गर्भवती महिलांना नाव नोंदणीसाठी व लसीकरणासाठी यावे लागते त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे व रुग्णांना रांगेमध्ये तासनतास उन्हात उभारावे लागत आहे.
या ठिकाणी पूर्णवेळ डॉक्टर व रुग्णाला बाहेर सावली , पिण्याचे पाणी ची व्यवस्था करणे गरजेचे आहे . नगर परिषद मुख्याधिकारी यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी करून उपाययोजना कराव्यात अशी मागणी शहरातून येणाऱ्या नागरिकांकडून होत आहे लसीकरणासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे व तासन्तास रांगा मध्ये उन्हामध्ये उभारावी लागत आहे त्यासाठी उपाययोजना कराव्या अशी मागणी नागरिकांनी उस्मानाबाद न्युज शी बोलताना यावेळी केली आहे.
छोट्या छोट्या झाडाच्या सावलीत बसलेले तपासणी साठी आलेले नागरिक ...
* प्रतिक्रिया
प्रशासनाने या ठिकाणी आरोग्य केंद्र , व लसीकरण केद्र सुरु करुन नागरिकांसाठी मोठी सोय केली आहे याठिकाणी पूर्णवेळ डॉक्टर हवे आहे व सावलीची , बसण्याची व्यवस्था झाली तर मोठ्या प्रमाणात नागरिकांना होणारा त्रास थांबेल - पठाण निशात