कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी ढोकी येथील तेरणा साखर कारखाना उच्च माध्यमिक प्रशाला येथे भेट देऊन आमदार राणा पाटील याची पाहणी
उस्मानाबाद :-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण या अगोदरही कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. मात्र वाढता प्रभाव लक्षात घेता अजून बेड उपलब्ध करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेष करुन मोठया गावांमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्याची नितांत आवश्यकता अधोरेखीत करत गावातील प्रमुखांना आमदार राणा पाटील यांनी आवाहन केले होते.
याच अनुषंगाने ढोकी गावातील प्रमुख लोकांनी देखील बैठक घेऊन कोविड केअर सेंटर सुरु करण्याची मागणी केल्यानंतर आज दि 28 एप्रिल रोजी आमदार राणा पाटील यांनी येथे भेट देऊन तेरणा साखर कारखाना उच्च माध्यमिक प्रशाला येथे जागेची पाहणी करून योग्य त्या सूचना देण्यात दिल्या
जिल्हा प्रशासनाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या नियमावली प्रमाणे या केंद्रांना सहकार्य करण्यात येईल. तसेच जनतेचा सहभाग व लोकवाटा या उपक्रमासाठी महत्वाचा राहणार आहे. या प्रक्रियेत गरजेनुसार १००० खाटा उपलब्ध करण्याची जबाबदारी स्वीकारली होती. याला मोठा प्रतिसाद देत व खरच काळाची गरज असल्याचे सांगत जिल्ह्यातील अनेक गावात प्राथमिक बैठका होऊन सीसीसी केंद्राच्या स्थानाची निश्चीती झाली आहे व जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव देण्यात आले आहेत. अशी माहिती आमदार राणा पाटील यांनी दिली
ज्या गावांत जागेची निश्चिती झाली आहे अश्या गावांना बेड उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ढोकी येथील नियोजित कोविड केअर सेंटर (सीसीसी) साठी ३० बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच तेर येथेही ३० बेड उपलब्ध करण्यात आले. ५० बेडची क्षमता असलेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची संख्या पाहून आवश्यकतेनुसार बेड उपलब्ध करण्यात येतील. अशी माहिती आमदार राणा पाटील यांनी दिली
यावेळी ढोकी गावाचे उपसरपंच श्री.अमोल समुद्रे, श्री.झुंबर बोडके, श्री.निहाल काझी, श्री.प्रमोद देशमुख, श्री.विलास रसाळ, श्री.संजय शिंदे, श्री.भाऊसाहेब गरड, श्री.महादेव गाढवे आदी उपस्थित होते.