माझे कुटुंब माझी जबाबदारी, तुळजापूर नगर परिषदेच्या वतीने शहरात १० पथकामार्फत आरोग्य तपासणी
तुळजापूर :- तुळजापूर नगरपालिकेच्या वतीने मा. मुख्याधिकारी साहेब व मा. नगराध्यक्ष सचिन रोचकरी साहेब यांच्या मार्ग दर्शनाखाली तुळजापूर शहरात एकूण 10 पथकामार्फत प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेचा भाग म्हणून प्रभाग क्र 1मध्ये सदर तपासणी पथकातील नगर परिषद कर्मचारी श्री. वैभव पाठक, श्री. प्रमोद भोजने ,श्रीमती अमृतराव,श्री. प्रफुल्ल खडागळे यांनी आज नगराध्यक्ष सचिन ज्ञानोबा रोचकरी यांच्या कुटुंबास भेट देऊन सदर कुटुंबातील सर्व व्यक्तींची तपासणी केली. सदर प्रसंगी नगराध्यक्ष श्री सचिन ज्ञानोबा
रोचकरी यांनी सांगितले की, सदर योजना ही अतिशय चांगली असून त्यामुळे कोरोना बाधित व्यक्ती शोधणे प्रशासनाला सुलभ होऊन त्यांच्यावर वेळीच योग्य उपचार वैद्यकीय पथकामार्फत करणे सुलभ होणार आहे. यासाठी आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येक पथकास सहकार्य करून नागरिकांनी आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे.
बातमी संकलन :- रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद