लोहारा / प्रतिनिधी
लोहारा : एकिकडे कोरोनाची लसीकरण मोहीम राज्यभर सुरू झाली असली तरी कोरोनाचा संसर्ग थांबता थांबत नाही अशी परिस्थिती संपूर्ण राज्यासह लोहारा तालुक्यात निर्माण झाली आहे. तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आणखी वाढण्यास प्रारंभ झाल्याने अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहे. शहरात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनास रोखण्यासाठी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे .त्यासाठी लोहारा शहरातील आयडियल ग्रुप ऑफ 1987 यांच्या वतीने ऑक्सिमिटर ,थर्मल स्कॅनिंग मशीन ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.आयडियल ग्रुपच्या पुढाकाराने लोहारा शहरातील ग्रामीण रुग्णालय आणि लोहारा नगरपंचायत यांना शनिवारी वैद्यकीय अधिकारी डॉ. साठे आणि नगरपंचायत लोहारा मुख्याधिकारी गजानन शिंदे यांच्याकडे आॅक्सीमीटर शहरातील कोरोना पेशंट शोधून उपचार करण्यासाठी देण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोकणे, बालाजी मक्तेदार , संजय संधीकर, सादिक शेख,दत्ता फावडे, चिदानंद स्वामी आदी उपस्थित होते.ऑक्सिमिटरचे वाटप करण्यात आले असून या किटच्या सहाय्याने नागरिकांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजता येणार आहे. गावची असलेली बांधिलकी मानून आयडियल ग्रुपने कोरोना मदत नव्हे सामाजिक कर्तव्य ह्या ब्रीदवाक्या नुसार गावातील नागरिकांसाठी पल्स ऑक्सिमिटर भेट दिले.आपण ज्या गावात जन्मलो त्याचे आपण काहीतरी देणे लागतो ही सामाजाप्रती ऋण व्यक्त करण्याची सामाजिक भावना समजून आयडियल ग्रुपने आज ह्या वस्तू ग्रामीण रुग्णालय आणि नगरपंचायत कार्यालयास भेट दिल्या.
प्रतिक्रिया....
कोरोनाच्या कठीण काळात सामाजिक बांधिलकी जपत आमच्या ग्रुपने ऑक्सिमिटर भेट दिले आहेत.शहरातील इतर ही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन कोरिनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करावी तसेच ग्रामीण रुग्णालय आणि शहरात आवश्यक असणाऱ्या ठिकाणी ऑक्सिमिटर, थर्मल गन या वस्तू उपलब्ध करून घ्याव्यात......जालिंदर कोकणे,सामाजिक कार्यकर्ते.