google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 धाराशिव साखर कारखाना येथील ऑक्सीजन निर्मिती विभाची जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडून पाहणी - DM Osmanabad

धाराशिव साखर कारखाना येथील ऑक्सीजन निर्मिती विभाची जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडून पाहणी - DM Osmanabad

0
धाराशिव साखर कारखाना येथील ऑक्सीजन निर्मिती विभाची जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडून पाहणी

उस्मानाबाद :- राज्यात ऑक्सीजन चा तुटवडा निर्माण होत आहे . त्या अनुषंगाने खा.शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांनी वसंत दादा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ऑक्सीजन निर्मिती करण्याचे अवाहन केले . होते त्यानुसार कळंब तालुक्यातील धाराशिव साखर कारखान्याने ऑक्सीजन निर्मितीसाठी पायलट प्रोजेक्ट सुरु करणाची तयारी दर्शविल्याने त्यांना वसंत दादा इन्स्टिट्यूटची परवानगी मिळाली होती ऑक्सिजन निर्मिती प्रोजेक्टचे काम सुरु झाले असून या कामाची पाहणी करण्यासाठी Osmanabad
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पाहणी केली . 

यावेळी चेअरमन अभिजित पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना येत्या सोमवार पर्यंत ऑक्सीजन निर्मितीला प्रत्यक्षात सुरुवात होईल असे सांगितले . 

साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी यासाठी झालेल्या राज्य साखर संघाच्या झूम मिटिंग मध्ये धाराशिव साखर कारखान्याने चेअरमन अभिजीत पाटील यांनी ऑक्सिजन तयारी दर्शविल्याने साखर संघाच्या वतीने त्यांना रीतसर परवानगी देण्यात आली होती. यासाठी मौज इंजिनिअरिंग कंपनीकडून मशिनरी उपलब्ध झाल्या असुन प्रोजेक्ट उभारणीचे काम वेगात सुरु असुन प्रोजेक्ट उभारणी साठी कंपणीचे सहा इंजिनिअर आणि पंधरा कर्मचारी कार्य करत आहेत.


या प्रोजेक्ट उभारणी कामाची जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पाहणी केली. यावेळी कळंब उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ , अप्पर जिल्हाधिकारी शिवलेश्वर स्वामी , तहसीलदार रोहन शिंदे , महसुल मंडळ अधिकारी डी.एम.कांबळे , तलाठी एस.जी.कावळे , एस . आर.सय्यद उपस्थित होते . या वेळी चेअरमन अभिजीत पाटील यांनी बोलताना सांगीतले की , ऑक्सिजन निर्मिती बाबत आज चार वाजता जिल्हाधिकारी साहेबांची मुख्यमंत्री यांच्याशी ऑनलाईन मिटिंग असल्याने त्यांनी धाराशिव कारखान्याच्या ऑक्सिजन निर्मिती प्रोजेक्टच्या कामाची पाहणी केली काही कागदोपत्री पूर्तता राहिल्या असुन येत्या सोमवार पासुन प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात होईल अशी माहिती दिली आहे. 

या प्रोजेक्टमुळे उस्मानाबाद जिल्हा सह  शिल्लक राहिलेला ऑक्सिजन शेजारील जिल्ह्यांना देखील याची मदत होणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top