लाँकडाउन च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 10 दुकानदारांवर कारवाई
उस्मानाबाद :- कोविड 19 या च्या प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करणार्या येरमाळा येथील 10 दुकानदारावर दुकाने सील करून कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत उघडे राहतील या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे ही दुकाने 1 मे पर्यंत हि दुकाने सील करण्यात आली आहेत.
या मध्ये न्यु आशीर्वाद सेल्स , किरण फुटवेअर , नौशाद कोल्ड्रिंक्स , आदर्श किराणा स्टोअर्स , जाधवर मशिनरी , माऊली ट्रेडर्स & पशुखाद्य , अंजु मेडिकल , संतोष किराणा स्टोअर्स , स्वराज्य कल्केशन , हाँटेल सहेली येरमाळा रोड मसेगाव अशी दुकाने कळंब तहसीलदार यांनी सील केली आहेत.