Osmanabad | करोना रुग्णवाढीचा भडका कायम..! कपील धरा समशान भूमीत 23 जणांवर अंत्यसंस्कार
Osmanabad | उस्मानाबाद - 'ब्रेक दी चेन'साठी राज्य सरकारने घोषित केलेल्या संचारबंदीलाही करोना विषाणू आता जुमानत नसल्याचे चित्र आज उस्मानाबाद मध्ये स्पष्ट झाले आहे. कालचे रेकॉर्ड ब्रेक करत दररोज सुरू असलेला करोनाबाधित रुग्णवाढीचा भडका आजही कायम असल्याचे समोार आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आजही 16 एप्रिल रोजी तब्बल 580 नवे करोनाबाधित रुग्ण सापडले असून, त्यात एकट्या उस्मानाबाद तालुक्यातील 300 रुग्णांचा समावेश आहे. व 15 एप्रिल रोजी 481 रुग उस्मानाबाद तालुक्यातील सापडले होते.
उस्मानाबाद ( Osmanabad city ) शहरातील कपील धरा समशान भूमीत आज 16 एप्रिल रोजी 23 जणांवर अंत्यसंस्कार नगरपालिके ने केले तर 14 एप्रिल रोजी 19 जणांवर अंत्यसंस्कार केले होते .
उस्मानाबाद ( Osmanabad ) जिल्हा प्रशासनाच्या हवाल्याने माहिती अधिकारी कार्यालयाने आज घोषित केलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आता मोठ्या संख्येने करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. उस्मानाबाद शहरा पाठोपाठ उमरगा तालुक्यात करोना विषाणूने थैमान घातले आहे. तेथेही आज 56 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात जसे रुग्णांना अॅडमीट करण्यासाठी साधे बेड, ऑक्सीजन बेड किंवा व्हेंटीलेटर मिळत नाहीत, तशीच अवस्था ईतर तालुक्यात होऊ नेय . या साठी प्रशासनाने आज पासुन आत्यावशक दुकाची वेळ कमी केली आहे . त्यात मेडिकल व दवाखाने व त्यासाठी लागणारी वाहतूकीसाठी 24 तास परवानगी दिली आहे.
करोना विषाणूने काल दि 15 एप्रिल रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील तब्बल 764 नव्या रुग्णांना घेरले. त्यामुळे जिल्ह्यातील चिंताजनक परिस्थिती आणखी गंभीर होत चालली असल्याचे चित्र आहे. 'ब्रेक दी चेन'चाही उस्मानाबाद शहरातील देशपांडे बस स्टॅन्ड जवडील भाजी मार्केट मध्ये
फज्जा उडाल्याचे चित्र आहे. दरम्यान, नेहमीप्रमाणे रस्त्यावर फिरणार्या नागरीकांना आवर घालण्यासाठी पोलिसांची यंत्रणा काही वेळा नंतर रस्त्यावर अभावानेच दिसत आहे.
शेवटी पोलिसांना देखील जीव आहे , परिवार , पहिल्याचं संकटात सापडलेल्या नागरिकांवर काय दंड करावा कोठुन दंड भरती हे देखील त्याच्या समोर उभा राहिले प्रश्न आहे.
ठराविक वेळा नंतर रस्त्यावर फिरताना हटकणारे कुणीच नसल्याने एवढ्या भयंकर संकटात देखील नागरिक बिनधास्त फिरत आहेत.
ज्यांच्या घरात करोनाबाधित आहेत. त्यांच्या मात्र काळजाचा ठोका चुकत आहेत. अशा संपूर्ण परिवाराची अगदीच केविलवाणी अवस्था झाली आहे. ओळखीचे, जवळचे किंवा मित्रांना फोन करुन करुन करोनाबाधित किंवा त्यांचे घरातील नातेवाईक अस्वस्थ झाले आहेत. कुठूनतरी मदत मिळेल, या आशेने ते फोना-फोनी करत आहेत.
मात्र, अनेकांचा नाईलाज होत आहे. त्यात अगदीच टोकाचे प्रयत्न करुनही ऑक्सिजन बेड किंवा व्हेंटीलेटर न मिळालेल्यांना मृत्यू कवेत घेत असल्याचे चित्र आहे. खिन्न मनाने घरातील व्यक्तिंवर अंत्यसंस्कार करताना अनेकांना आता नैराश्य येऊ पाहत आहे. मात्र, तरी देखील रस्त्यावरील गर्दी कमी होत नसल्याने हे थांबणार कधी? असे केविलवाणे प्रश्नचिन्ह अनेकांच्या चेहर्यावर पहायला मिळत आहे.


