उस्मानाबाद :- महाराष्ट्र शासनाने ' महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम , 2020 ' प्रसिद्ध केले असून यातील नियम क्र . 3 नुसार करोना विषाणुमुळे ( COVID - 19 ) उद्धवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे . ज्याअर्थी संदर्भ क्र . 5 अन्वये महाराष्ट्र शासनाने कोव्हिड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत दि . 30 एप्रिल 2021 पर्यंत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्याअर्थी मी कौस्तुभ दिवेगावकर , जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , उस्मानाबाद संदर्भ क्र . 2 अन्वये व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतुदींनुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील करोना विषाणु ( COVID - 19 ) चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून लॉकडाऊनच्या वाढविलेल्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने संदर्भ क्र . 5 च्या आदेशान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक 30 एप्रिल 2021 पर्यंत खालीलप्रमाणे कार्यवाही करणेबाबत आदेशित करीत आहे . 1. रात्रीची संचारबंदी ( NIGHT CURFEW ) , शनिवार व रविवार जनता कर्फ्यु व फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 लागू a ) या आदेशान्वये संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात येत आहे .
b ) सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेमध्ये सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास , जमाव करण्यास मनाई राहील .
c ) उर्वरित कालावधीत ( म्हणजे सोमवार ते गुरुवारी रात्री 8 ते सकाळी 7 आणि शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंतचा कालावधी ) वैध कारणांशिवाय अथवा या आदेशात परवानगी दिलेल्या खालील नमूद कारणां शिवाय कोणालाही सार्वजनिक ठिकाणी संचार करण्याची परवानगी असणार नाही दर शनिवार व रविवारी जनता कयूं राहील .
d ) वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवांकरिता होणा - या हालचाली अथवा कार्यांना कोणतेही निर्बध असणार नाहीत .
e ) अत्यावश्यक सेवांमध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल .
* दवाखाने , रोगनिदान केंद्रे , चिकित्सालये , वैद्यकीय विमा कार्यालये , औषधालये , औषध कंपन्या , चष्मा दुकाने , इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा . किराणा साहित्याची दुकाने , भाजीपाला , दुध संकलन व वितरण केंद्र , बेकरी , मिठाई , खाद्यपदार्थांची दुकाने केवळ पार्सल सेवा ) .
* सार्वजनिक वाहतूक व्यवस्था - रेल्वे , टॅक्सी , अॅटो व सार्वजनिक बसेस .
* विविध देशांच्या राजदूतांच्या कार्यालयांशी संबंधित सेवा .
* स्थानिक विभागांची / प्राधिकरणांची सर्व मान्सूनपूर्व करण्यात येणारी कामे .
* स्थानिक विभागाच्या प्राधिकरणांच्या सर्व सार्वजनिक सेवा ,
* मालवाहतूक कृषि विषयक सेवा .
* ई - वाणिज्य सेवा ( E - Commerce )
* मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमे
* स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अत्यावश्यक म्हणून निर्देशित केलेल्या सेवा
* सार्वजनिक ठिकाणची कार्यवाही ( Outdoor Activity ) :
जिल्ह्यातील सर्व किनारे , बगीचे / उद्याने , सार्वजनिक मैदाने , खेळाची मैदाने , क्रिडांगणे , स्पोर्टस कॉम्प्लेक्स , योगा क्लासेस , जिम , व्यायामशाळा , जलतरण तलाव पुढील आदेशापर्यंत बंद राहतील .
* दुकाने ( Shops ) , बाजारपेठा ( Markets ) व मॉल्स ( Malls ) मध्ये करावयाची कार्यवाही : सर्व दुकाने ( Shops ) , बाजारेपठा ( Markets ) व मॉल्स अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण दिवसभर बंद राहतील . पान , तंबाखू , सिगारेट व तत्सम वस्तूंची विक्री करणा -या पानटप -या पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद राहतील . ) अत्यावश्यक सेवांच्या दुकानांच्या आवारामध्ये ग्राहकांना सामाजिक अंतराचे पालन करता येण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करुन ती चालू ठेवावीत , सामान घेण्यासाठी प्रतिक्षेत असलेल्या ग्राहकांनी सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी आवश्यक त्या खुना ( Marking ) करण्यात याव्यात ,
* अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानदारांनी व त्याठिकाणी काम करणा - या व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण ( Vaccination ) करुन घ्यावे . तसेच खबरदारीच्या उपाययोजना जसे पारदर्शक काचेच्या किंवा इतर भौतिक आच्छादनांच्या आडून ग्राहकांशी संवाद साधणे , इलेक्ट्रॉनिक पेमेंट इ . चा अवलंब करावा .
c ) या आदेशान्वये बंद करण्यात आलेल्या दुकानांचे मालकांनी व त्याठिकाणी काम करणा -या सर्व व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण ( Vaccination ) करुन घ्यावे . तसेच खबरदारीच्या उपाययोजना जसे पारदर्शक काचेच्या किंवा इतर भौतिक आच्छादनांच्या आडून ग्राहकांशी संवाद इलेक्ट्रॉनिक पेमेंट इ . ची व्यवस्था करणेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी .
* सर्व आठवडी बाजार पूर्णपणे बंद राहतील .
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ( Public Transport ) :
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खालील नमूद निबंधांसह चालू राहील .
* अॅटोरिक्षा ( Auto Rickshaw ) चालक व 2 प्रवासी फक्त ( Driver + 2 Passengers only )
*टॅक्सी- चारचाकी चालक व परिवहन नियमांनुसार अनुज्ञेय क्षमतेच्या 50 % वाहन ( Taxi - 4 Wheelers ) क्षमता ( Driver + 50 % vehicle capacity as per RTO )
* बस ( Bus ) परिवहन विभागाच्या मान्यतेनुसार ( RTO Passing ) पूर्ण आसन | क्षमतेने ( Full seating occupancy ) प्रवासी वाहतूकीस परवानगी राहील .
परंतु प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्यास ( Standing | | Passengers ) मनाई राहील .
a ) सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणा - या सर्व व्यक्तींनी योग्य पद्धतीने मास्क घालणे बंधनकारक राहील . याचे उल्लंघन करणा - या व्यक्तीस रु . 500 / - इतका दंड आकारण्यात येईल ,
b ) चारचाकी टॅक्सीमध्ये मध्ये जर कोणत्याही व्यक्तीने मास्क घातलेला नसेल तर उल्लंघन करणारा व्यक्ती व टॅक्सी चालक यांना प्रत्येकी रु . 500 / - इतका दंड आकारण्यात येईल .
c ) प्रत्येक फेरी ( Trip ) नंतर सर्व वाहनांचे निर्जतूकीकरण ( Sanitization ) करण्यात यावे .
d ) सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये चालक व इतर कर्मचारी जे लोकांच्या संपर्कात येतात त्यांनी लवकरात लवकर भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण ( Vaccination ) करुन घ्यावे आणि लसीकरण पूर्ण होईपर्यंत कोरोना निगेटिव्ह असलेबाबतचे 15 दिवसापर्यंत वैध असलेले प्रमाणपत्र नेहमी सोबत ठेवावे . हा नियम 10 एप्रिल 2021 पासून लागू होईल . परंतु टॅक्सी व अॅटोरिक्षांच्या चालकांनी जर स्वतःचे पूर्णपणे पारदर्शक प्लास्टीक शीटच्या आवरणाने विलगीकरण ( isolation ) केले तर त्यांना या नियमातून वगळण्यात येईल ,
e ) जर वरिलप्रमाणे नमूद केल्यानुसार जर कोणीही निगेटिव्ह आरटीपीसीआर / अँटीजेन चाचणी प्रमाणपत्र न बाळगता / लसीकरण न करता आढळून आले तर रु . 1000 / - इतका दंडा आकारला जाईल .
1 ) परगावी जाणा -या रेल्वेच्या बाबतीत रेल्वे व्यवस्थापनाने रेल्वेच्या सर्वसामान्य कक्षामध्ये ( General Compartment ) प्रवासी उभे राहून प्रवास करणार नाहीत व सर्व प्रवाशी मास्क वापरतील याची दक्षता घ्यावी .
g ) सर्व रेल्वेमध्ये मास्क न वापरणा -या कोणत्याही व्यक्तीस रु . 500 / - इतका दंड आकारण्यात यावा ,
5. कार्यालये ( Offices ) :
a ) खालील नमूद कार्यालये वगळता सर्व खाजगी आस्थापनांची कार्यालये बंद राहतील .
* सहकारी , खाजगी व PSU बँका , पतसंस्था .
* BSEINSE विद्युत वितरण विषयक सेवा देणा - या कंपन्या
* दूरसंचार सेवा प्रदाते ( Telecom Service Providers )
* विमा / वैद्यकीय विमा कंपन्या ( Insurance / Mediclaim Companies )
* औषधनिर्मिती कंपन्यांची उत्पादन व वितरण सेवांकरिता गरजेची असलेली कार्यालये
* शासकीय कार्यालये 50 % उपस्थितीमध्ये सुरु राहतील
तथापि जी कार्यालये कोविड -19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या कार्यवाहीकरिता 100 % उपस्थितीमध्ये चालू ठेवणे आवश्यक आहे त्या शासकीय विभागांचे / कार्यालयांचे प्रमुख ( HOD ) यांचे निर्णयानुसार 100 % क्षमतेने सुरु राहतील.
c ) विद्युत सेवाविषयक सर्व शासकीय कार्यालये व शासकीय कंपन्या , पाणीपुरवठा व बँकींग सेवा व इतर आर्थिक सेवा ( financial services ) पूर्ण क्षमतेने चालू राहतील .
d ) सर्व शासकीय कार्यालये व शासकीय कंपन्यांमध्ये शासकीय कार्यालयाचे आवारामध्ये उपस्थित असलेले कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांचेव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तींसोबत घ्यावयाच्या बैठका ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात .
e ) सर्व शासकीय कार्यालये व शासकीय कंपन्यांमध्ये भेट देण्याची अभ्यागतांना परवानगी असणार नाही . कार्यालयांनी लवकरात लवकर e - visitor प्रणाली सुरु करावी .
1 ) अतितातडीच्या परिस्थितीमध्ये शासकीय कार्यालयांमध्ये येण्याच्या 48 तासांपूर्वीचा निगेटीव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल असलेल्या अभ्यागतांस कार्यालयामध्ये येण्यासाठी पास देण्याची परवानगी कार्यालयाप्रमुख देऊ शकतील ,
g ) सर्व खाजगी व शासकीय कार्यालयांमधील व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण ( Vaccination ) करुन घ्यावे .
6. खाजगी वाहतूकव्यवस्था ( Private Transport ) : खाजगी बसेस व खाजगी वाहने सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत चालू राहतील व इतर कालावधीत ( म्हणजे सोमवार ते गुरुवारी रात्री 8 ते सकाळी 7 आणि शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंतचा कालावधी ) अतितातडीच्या व अत्यावश्यक सेवांकरिता चालू ठेवता येतील . खाजगी बसेसकरिता खालील बाबींचे पालन करणे आवश्यक राहील .
a ) आसनक्षमतेइतक्याच प्रवाशांची वाहतूक करणे . प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्याची मनाई राहील .
b ) खाजगी बसेसमधील सर्व कर्मचा - यांनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण ( Vaccination ) करुन घ्यावे , सर्व कर्मचा - यांकडे 15 दिवसांपर्यंत वैध असलेल्या निगेटिव्ह आरटीपीसीआर / अॅटीजेन चाचणीचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक राहील . हा नियम दि . 10 एप्रिल 2021 पासून लागू होईल .
7. करमणूक व मनोरंजन ( Recreation and Entertainment ) क्षेत्र :
a ) चित्रपटगृहे . सिनेमा हॉल्स बंद राहतील .
b ) नाट्यगृहे व सभागृहे बंद राहतील .
c ) मनोरंजन केंद्रे ( Amusement Parks ) / Arcades / व्हिडीओ गेम सेंटर्स बंद राहतील .
d ) वॉटर पार्क्स ( Water Parks ) बंद राहतील .
e ) क्लब्स , जलतरण तलाव , व्यायामशाळा ( Gyms ) व स्पोर्ट कॉम्प्लेक्स बंद राहतील . 1 ) वरिल नमूद आस्थापनांशी संबंधित सर्व व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण ( Vaccination ) करुन घ्यावे . g ) चित्रपटामालिका / जाहिराती यांचे चित्रीकरणास खालील नियमांनुसार परवानगी राहील .
i . जास्त संख्येने कलाकारांच्या उपस्थितीमध्ये चित्रीकरण करण्यात येऊ नये .
ii . चित्रीकरणाशी संबंधित सर्व व्यक्ती व कलाकारांनी 15 दिवसांपर्यंत वैध असलेला निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सोबत ठेवावा . हा नियम दि . 10 एप्रिल 2021 पासून लागू होईल .
8. रेस्टॉरंट्स , बार , हॉटेल यांनी करावयाची कार्यवाही :
a ) निवासी सेवा असलेल्या हॉटेलच्या आवारामध्ये असलेले व हॉटेलमधील एक भाग असलेले रेस्टॉरंट्स व बार वगळता उर्वरित सर्व रेस्टॉरंट्स व बार बंद राहतील ......
b ) सोमवारी ते शुक्रवारी सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेमध्ये पार्सल , ऑर्डर दिलेले पदार्थ घेऊन जाणे ( Take away orders ) व घरपोच सेवा ( Home delivery ) देण्यास परवानगी राहील .
c ) निवासी सेवा असलेल्या हॉटेल्समध्ये असलेले रेस्टॉरंट्स व बार हॉटेलमध्ये निवासाकरिता असलेल्या अतिथिकरिताच चालू ठेवता येतील . हॉटेलमध्ये निवासाकरिता नसलेल्या व्यक्तीकरिता वरिल मुद्दा क्र . ( 8 ) ( b ) प्रमाणे कार्यवाही करावी . d ) घरपोच सेवे ( Home delivery ) च्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण ( Vaccination ) करुन घ्यावे . तथापि लसीकरण केलेले नसल्यास त्या व्यक्तीने 15 दिवसापर्यंत वैध असलेला निगेटिव्ह आरटीपीसीआअँटीजेन अहवाल सोबत ठेवणे आवश्यक राहील . हा नियम दि . 10 एप्रिल 2021 पासून लागू होईल .
e ) वरिलप्रमाणे नमूद केल्यानुसार निगेटिव्ह आरटीपीसीआर / अँटीजेन प्रमाणपत्र किंवा लसीकरण केलेले नसल्यास दि . 10 एप्रिल 2021 नंतर उल्लंघन करणा - या व्यक्तीवर रु . 1000 / - व उल्लंघन करणा - या आस्थापनेवर रु . 10,000 / - इतका दंड आकारण्यात येईल . वारंवार उल्लंघन आढळून आल्यास कोविड 19 जोपर्यत साथरोग म्हणून अधिसूचित राहील तोपर्यंत संबंधित आस्थापना चालू ठेवण्याची परवानगी ( Licenses ) रद्द करण्यात येईल .
रेस्टॉरंट व बार या आस्थापनांमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी यांनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण ( Vaccination ) करुन घ्यावे .
9. धार्मिक स्थळे / प्रार्थनास्थळे :
a ) सर्व धार्मिक स्थळे / प्रार्थनास्थळे बंद राहतील .
b ) धार्मिक स्थळे / प्रार्थनास्थळे याठिकाणच्या व्यवस्थापनामधील सेवेमध्ये सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींना त्यांची सेवा ( साफसफाई , नित्य पूजा , दिवाबत्ती , इ . ) नेहमीप्रमाणे बजावता येईल . तथापि भाविकांना धार्मिक स्थळे / प्रार्थनास्थळे याठिकाणी प्रवेशाची परवानगी असणार नाही .
c ) धार्मिक स्थळे / प्रार्थनास्थळे याठिकाणच्या व्यवस्थापनामधील सर्व व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमानुसार तात्काळ लसीकरण ( Vaccination ) करुन घ्यावे .
10. केशकर्तनालये / स्पा / सलूनाब्युटी पार्लर्स :
a ) केशकर्तनालये / स्पा / सलूनाब्युटी पार्लर्स बंद राहतील .
b ) या आस्थापनांमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी यांनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण ( Vaccination ) करून घ्यावे .
11. वर्तमानपत्रे ( Newspapers ) :
a ) वर्तमानपत्रांची छपाई व वितरण करता येईल .
b ) सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेमध्ये घरपोच सेवा देण्यास परवानगी राहील .
c ) याठिकाणी काम करणारे सर्व व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण ( Vaccination ) करुन घ्यावे . घरपोच सेवा पुरविणा - या सर्व व्यक्तींनी 15 दिवसांपर्यंत वैध असलेले निगेटिव्ह आरटीपीसीआराॲटीजेन चाचणी प्रमाणपत्र सोबत ठेवावे . हा नियम दि . 10 एप्रिल 2021 पासून लागू होईल .
12. शाळा व महाविद्यालये :
a ) शाळा व महाविद्यालये बंद राहतील . तथापि वैद्यकीय व निमवैद्यकीय ( Medical & Paramedical ) अभ्यासक्रमाची महाविद्यालये , नर्सिंग कॉलेजेस ( सरकारी , खाजगी सर्व ) ही अत्यावश्यक वैद्यकीय सेवा यामध्ये येत असल्याने ती चालू राहतील .