कळंब व वाशी तालुक्यातील ग्रामीण भागात 5 मे पर्यंत जनता कर्फ्यू
उस्मानाबाद :- ( Osmanabad ) जिल्ह्यातील कळंब व वाशी तालुक्यात ग्रामीण भागात ज्या गावात कोविड positive active रुग्णांची संख्या वाढत आहे
अशा गावात 23 एप्रिल च्या मध्य रात्री पासुन 5 मे पर्यंत जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे.
वाशी तालुक्यातील शेडी , इंदापुर , ईसरुप , शेवगाव ,जवळका या गावात व कळंब तालुक्यातील मोहा डिस्कड , हासेगाव ( के ) , घारगाव , आथर्डी , मगरुड , येरमाळा , शिराढोण , ताडगाव , गोविंदपुर , ढोराळा , यावात जनता कर्फ्यू चे आदेश आहिल्या गाठाळ , उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी , कळंब , यांनी आदेशीत केले आहे . आदर्श आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नियमानुसार कारवाई करावी असे आदेशात नमूद केले आहे .
फक्त दवाखाने, मेडिकल स्टोअर्स सुरू राहतील.
जीवन आवश्यक वस्तु चा पुरवठा घरपोच सेवा सुरू राहील. प्रशासनाने अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट केलेली अत्यावश्यक दुकाने यावेळी चालू राहणार आहेत.