दिलासादायक - परिस्थिती सुधारतेय उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचे 125 बेड रिक्त, रुग्णसंख्येत घट : एकूण 275 बेडवर उपचार
उस्मानाबाद : ( संपादक - सलीम पठाण )
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे, शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयात नवीन बिल्डिंग मध्ये ऑक्सिजनचे 400 बेड ची व्यवस्था करण्यात आली आहे 20 दिवसापुर्वी या ठिकाणी बेड उपलब्ध होत नव्हते. जिल्ह्यात रोज 700 पेक्षा जास्त रुग्ण चाचण्या दरम्यान पॉजिटिव्ह येत होते. मात्र मागील 4 - 5 दिवसांपासुन जिल्हात रुग्णसंख्येत घट झाली आहे. मात्र मृत्यू दर कायम आहे रोज जिल्ह्यात 7 ते 10 जणांचा मृत्यू होत आहे.
उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयातुन मिळालेल्या माहिती नुसार जिल्हा शासकीय रुग्णालयात सकाळी 125 बेड रिक्त झाले आहेत. 275 बेडवर कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील दीड ते दोन महिन्यासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 7 हजाराच्या पार गेली होती.
रुग्णांना बेड मिळविण्यासाठी मोठ्या अडचणी येत होत्या. रुग्णांसोबत त्यांच्या नातेवाइकांचीही होरपळ होताना दिसून येत होती. बेडचा शोध घेईपर्यंत रुग्णांच्या प्रकृतीत आणखी बिघाड झाल्याने अनेकांना मृत्यू ओढवत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. एका रुग्णालयातून दुसया रुग्णालयात चौकशी सुरूच होती. अनेक नातेवाईक रुग्णवाहिकेसोबत रुग्णांना घेऊन या रुग्णालयातुन त्या रुग्णालयात फिरत होते. मागील काही दिवसांपासून शहरी भागात रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रुग्णालया बरोबर प्रशासनावरील ताण देखील कमी होत आहे.
उस्मानाबाद जिल्हात 23 मे रोजीच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 4 हजार 456 रुग्ण जिल्ह्यात उपचाराखाली आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात 1 हजार 182 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात 52 हजार 369 रुग्णांची नोंद झाली आहे.
प्रशासनाने आज पासून आत्यावशक खरेदी साठी सकाळी 7 ते 11 वेळ दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी 9 दिवसांच्या जनता कर्फ्यु नंतर खरेदी साठी मोठी गर्दी केल्याच्या दिसून आले. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे पालन करावे असे आवाहन नेहमी करण्यात येत आहे . 90 % नागरिक नियमांचे पालण करत आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे. हे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी लागु केलेल्या 9 दिवसाच्या जनता कर्फ्यु मुळे मिळालेले यश असावे असे म्हणता येईल.