कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी वाहनधारकांवर उपासमारीची वेळ
लोहारा / सुमित झिंगाडे )
राज्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे परंतु छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनवर यांचा चांगलाच फटका जाणवत आहे त्यामुळे खाजगी वाहनधारकांना उपासमारीची वेळ आली आहे त्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे खासगी वाहनांना आर्थिक फटका बसला असून वाहनांवर असलेले लोन फेडण्यासाठी कर्ज बाजारी होण्याची वेळ खाजगी वाहनधारकांवर येत आहे कोरोनाचा वाढता प्रदुभाव बगता सरकारच्या आदेशाचे पालन करण्यासाठी सर्व नागरिकांतून प्रतिसाद जरी असला तरी हातांवर पोट असणाऱ्या छोट्या मोठ्या व्यवसायिकांना आर्थिक फटके सहन करण्याची वेळ येत आहे, मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकरी मजूर तसेच छोट्या मोठ्या व्यवसायिक मात्र अडचणीत आले असून या परिस्थितीत पोटाची खळगी भरण्यासाठी जीवाची पर्वा नकरता दिवसरात्र खाजगी वाहन चालवून आपली उपजीविका भागवून वाहनांवर असलेल्या खाजगी बँकेचे लोन फेडायचे तर कसे मागच्या काळात सोने चांदी गहान व सावकारी केले होते, तेही अजून फिटले नाही तर आता कसे करायचे असा सवाल यावेळी उपस्थित होत आहे, कोरोनाच्या भयंकर परिस्थितीत तरी खाजगी लोनची वसुली थांबवून हप्ते शिथिल करण्याची मागणी खाजगी वाहनचालका कडून होत आहे,