माकणी येथे सुरु करण्यात आलेल्या आयसोलेशन केंद्राला आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने 25 बेडची मदत – जि.प.चे समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे यांनीही केली पाहणी

0
माकणी येथे सुरु करण्यात आलेल्या आयसोलेशन केंद्राला आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने 25 बेडची मदत – जि.प.चे समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे यांनीही केली पाहणी

 ( इकबाल मुल्ला )

 लोहारा तालुक्यातील माकणी येथे लोकसहभागातून सुरु करण्यात आलेल्या आयसोलेशन केंद्रासाठी तुळजापूरचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून 25 बेडची मदत करण्यात आली आहे. माकणी ग्रामपंचायतने लोकसहभागातून सुरू केलेल्या या केंद्रात याआधी 25 बेडची व्यवस्था केली होती. याठिकाणी आता एकूण 50 बेडची व्यवस्था झाली आहे. या आयसोलेशन केंद्रास उस्मानाबाद जि.प. चे समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे यांनी भेट देऊन पाहणी करुन येथील रुग्णांची विचारपुस केली. या केंद्रास 50 लिटर सॅनिटायझर उपलब्ध करून दिले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली व पाहणी केली. यावेळी कोरोना उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी सरपंच विठ्ठल साठे, उपसरपंच वामन भोरे, भाजपाचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम साठे, माजी उपसरपंच दादासाहेब मुळे, विजय ओवांडकर, शिवाजी साठे, बालाजी साठे, यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top