उस्मानाबाद जिल्ह्यात पुढील नऊ दिवस जनता कर्फ्यु - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर - 9 days public curfew in Osmanabad district

0


उस्मानाबाद जिल्ह्यात पुढील नऊ दिवस जनता कर्फ्यु - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर 

वैद्यकीय सेवांसह कृषीविषयक अस्थापनाना सुरु राहणार ..


 उस्मानाबाद ( osmanabad )  : जिल्ह्यात जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता खबरदारी म्हणून ( 9 days public curfew in Osmanabad district ) प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. १५ ते २४ मे या काळात हा जनता कर्फ्यु असणार आहे. यामध्ये वैद्यकीय सेवा चोवीस तास सुरू राहणार आहेत. कृषीविषयक अस्थापनाना ७ ते १२ वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. तसेच  जिल्ह्यातील पेट्रोल पंप केवळ अत्यावश्यक सेवांसाठी सकाळी ७ ते १२ या वेळेमध्ये सुरु राहणार आहेत. जिल्ह्यात सध्या ६ हजार १०७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर एक हजाराहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. Osmanabad जिल्ह्यात यापूर्वीही ८ मे ते १३ मे पर्यंत पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र रमजानच्या पार्श्वभूमीवर या लॉकडाऊनमध्ये शेवटचे दोन दिवस सूट देण्यात आली होती. कोरोना संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी नऊ दिवसांचा हा कडक जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. नागरिकांनी याला प्रतिसाद देऊन घरातच सुरक्षित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top