कळंब - कोरोना सारख्या महाभयंकर काळात राज्यात रक्ताचा तुडवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार व प्रदेश अध्यक्ष ना.जयंतरावजी पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार कामगार दिनाचे औचित्य साधून डॉ.ऋषिकेश भवर यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१-५-२०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका व सम्राट ग्रुपच्या वतीने सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न झाले. या रक्तदानाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज व यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. या शिबिरात ६२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.हे रक्तदान संकलित करण्यासाठी उस्मानाबाद येथील रक्तपिढीचे कर्मचारी आले होते.
यावेळी तालुकाध्यक्ष श्रीधर भवर,ज्येष्ठ नेते अँड.प्रविण यादव, वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.तुषार वाघमारे, प्रा.डॉ.बाळकृष्ण भवर,डॉ. शक्तीकुमार भवर,सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष किरण मस्के,उपाध्यक्ष भाऊ कुचेकर,कार्याध्यक्ष शंकर टोपे,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भीमराव हगारे,कार्याध्यक्ष अतुल धुमाळ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष उमेश मडके,उपशहराध्यक्ष अजय जाधव,प्रियदर्शनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप शिंदे,तालुका प्रसिद्धी प्रमुख अविनाश घोडके,सोशल मिडिया तालुका अध्यक्ष सुरेश घोगरे,बापू खबाले,सम्राट ग्रुपचे मनोज शिंदे,सौरव मुंडे,आकाश धनावडे,सूरज शिंदे,किसना शिंदे,आशिष चंदनशिव,अण्णा वनकळस,कृष्णा काटे,अशोक जगताप,बालाजी भातलंवडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .