नळदुर्ग पोलिस ठाणे हद्दीत खुन !

0



नळदुर्ग  पोलिस ठाणे हद्दीत खुन ! 

नळदुर्ग : - बहिन- बालीका हिस तीचा पती- सिद्राम वसंतराव बर्वे उर्फ सिधु, वय 32 वर्षे, रा. मानेवाडी, ता. तुळजापूर हा वारंवार त्रास देत असल्याने बालीका यांचा गावातच राहणारा भाऊ- रमेश हाके यांसह तुकाराम हाके, भाऊराव हाके हे तीघे दि. 05.05.2021 रोजी 15.30 वा. सु. बालीकाच्या सासरी पोचले. यावेळी बहीनीस माहेरी घेउन जातांना रमेश हाके याने पिकअप वाहन क्र. एम.एच. 13 एएन 4239 हा भाऊजी- सिद्राम बर्वे यांच्या अंगावरुन चालवून त्यांचा खून केला. अशा मजकुराच्या मयताचे पिता- वसंतराव रावसाहेब बर्वे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 34 अंतर्गत नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top