Osmanabad : ईमेल च्या माध्यमातून 5 लाख 91 हजार 5 शे रुपयांची फसवणूक
भुम : काकासाहेब अर्जुन रांजवण, रा. पाथ्रुड, ता. भुम यांना दि. 14- 26.03.2021 दरम्यान आमिष दाखवणारे ई-मेल प्राप्त झाले. त्याची सत्यता न तपासता काकासाहेब यांनी त्या ई-मेलमध्ये सांगीतल्याप्रमाणे तीन मोबाईल क्रमांकांच्या खात्यांवर युपीआयद्वारे वेळोवेळी एकुण- 5,91,500 ₹ रक्कम भरली. कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे काकासाहेब यांच्या लक्षात आले. अशा मजकुराच्या काकासाहेब रांजवण यांनी दि. 05 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 419, 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (क) (ड) अंतर्गत भूम पोलीस ठाणा मध्ये गुन्हा नोंदवला आहे.