Osmanabad जिल्ह्यात 4 ठिकाणी चोरी गुन्हे दाखल
पोलीस ठाणे, वाशी: मांडवा येथील इंडस कंपनीच्या भ्रमणध्वनी मनोऱ्याखालील खोलीचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 04.05.2021 रोजी मध्यरात्री तोडून आतील अमार राजा व एचबीएल कंपनीच्या एकुण 45 बॅटऱ्या तसेच गोजवाडा येथील जिओ कंपनीच्या मनोऱ्याची 40 मिटर केबल चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या महादेव पंडीत ढवण, रा. खंडाळा, ता. तुळजापूर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, परंडा: वडनेर- देवगांव भगात असलेल्या उल्का नदीच्या वाळु घाटावरील सीसीटीव्ही- 3 नग, डीव्हीआर- 1 नग, सीसीटीव्ही एमएमपीएस- 3 नग, केबल झीब- 1 नग, स्क्रिन- 1 नग, स्पल्क गार्ड- 1 नग इत्यादी साहित्य अज्ञात व्यक्तीने दि. 18- 19.04.2021 रोजी दरम्यानच्या रात्री चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या ठेकेदार- संतोष उध्दव साबळे, रा. डोमगांव, ता. परंडा यांनी दि. 05 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, आनंदनगर: क्रेडीट ॲशेस ग्रामीण कंपनी, शाखा उस्मानाबाद येथील कार्यालयातील कर्मचारी- बापुराव केरबा गोरटकर, रा. उस्मानाबाद हे दि. 28- 29.04.2021 रोजीच्या रात्री कार्यालयाच्या वरच्या खोलीत दरवाजा उघडा ठेउन झोपले होते. ही संधी साधून अज्ञात व्यक्तीने कार्यालयाचे टॅबलेट संगणक- 3 नग तसेच सहकाऱ्यांचे स्मार्टफोन- 2 नग व कागदपत्रे, एटीएम कार्ड, 6,000 ₹ रोख रक्कम असलेले पॉकेट चोरुन नेले. अशा मजकुराच्या बापुराव गोरटकर यांनी दि. 05 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, तुळजापूर: अनंत शिवाजी वीर, रा. जिजामातानगर, तुळजापूर यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एआर 3095 ही दि. 26.04.2021 रोजी 10.00 वा. सु. राहत्या घरासमोर लावली होती. ती त्यांना 17.00 वा. सु. लावल्या जागी न आढळल्याने ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या अनंत वीर यांनी दि. 05 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.