जागजी येथे लसीकरण केंद्राला बिडीओ समृध्दी दिवाणे यांची भेट

0
जागजी येथे लसीकरण केंद्राला बिडीओ समृध्दी दिवाणे यांची भेट

  उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जागजी. ता.जी. उस्मानाबाद येथे दिनांक 18/05/2021 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात 45 वर्ष पुढील नागरिकांसाठी व फ्रंट लाईन वर्कर यांचे साठी कोविशिल्ड लस चा पहिला डोस चे आयोजन करण्यात आले होते या लसीकरण कार्यक्रमाला पंचायत समिती उस्मानाबाद चे गटविकास अधिकारी श्रीमती. समृध्दी दिवाणे यांनी भेट देऊन पाहणी केली व 100% लसीकरण पुर्ण करण्याच्या सूचना दिल्या तसेच कोरोना संबंधी ग्रामपंचायत ने केलेल्या उपाय योजना ची माहिती घेतली व पुढील काळात करावयाच्या उपाययोजना बद्दल मार्गदर्शन केले. या वेळी सरपंच श्री. लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच श्री. वैजीनाथ सावंत, ग्रा.पं सदस्य श्री. चंद्रकात माळी, रणधीर पाटील, सुरेश सावंत, पत्रकार दिपक सावंत, सामाजिक कार्यकर्ते विक्रसिंह देशमुख विस्तार अधिकारी श्री. पी. बी. वलसे, श्री. हजारे साहेब, मंडळ अधिकारी श्री. कुलकर्णी साहेब,  अंगणवाडी पर्यवेक्षिका पाटील मॅडम,वैद्यकीय अधिकारी डॉ. दिव्या इंगळे, डॉ. निशा रोकडे, ग्रामविकास अधिकारी श्री. सचिन वाघे,  ग्रामसेवक(काजळा) श्री. नितीन रणदिवे, तलाठी श्री. कासराळे. आर.एन. मुख्याध्यापक श्री. बापुराव मेंढेकर, ढेकणे सर, पोलीस पाटील सुभाष कदम, पोलीस कर्मचारी थोरात , सुभाष भांडवले, महादेव मगर, लहू सावतर, हेमंत मगर व इतर हजर होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top