ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक लसीबाबत जनजागृती.

0
कोरोना प्रतिबंधक लसीबाबत जनजागृती.

पोलिस पाटील महादेव नरवडे यांचा उपक्रम.

सांगवी (का)प्रतिनिधी.

पिंपळा बुद्रुक येथील लोकांत कोरोनाविषयी जनजागृती तसेच त्यांचे प्रबोधन करण्याचे काम गावचे पोलीस पाटील श्री. महादेव नरवडे यांनी केले आहे. पिंपळा बु. गावात लस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण खूप कमी आहे. गावातील लोकांना लसीकरणाचे महत्व , कोरोनास दूर ठेवण्यासाठी लस घेणे किती गरजेचे आहे हे त्यांनी नागरिकास पटवून दिले. गावातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र काटगाव येथे जावे लागते .पिंपळा ते काटगाव हे अंतर 12 किलोमीटर असून वाहनाची कोणतीही व्यवस्था नाही. अनेक ज्येष्ठांना जाण्याची सोय नाही ही अडचण लक्षात घेऊन श्री. महादेव नरवडे व कुबेर उत्तम नरवडे या तरुणाने स्वखर्चातून खाजगी वाहनांची सोय उपलब्ध करून सर्वांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचते केले. एकूण २७ नागरिकांचे लसीकरण केले असून यानंतरही  लस उपलब्ध असेल तेव्हा ही सोय केली जाणार आहे.

तसेच घरोघरी जाऊन वाहनाची सोय केली असून लस घेण्याची विनंतीही त्यांनी केली. प्रत्यक्ष सोबत जाऊन गावातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे सामाजिक कार्य त्यांनी केले आहे. आता यानंतर लस केव्हा आहे याबाबत नागरिकाकडून त्यांना विचारणा होत असून आम्ही ही लस घेण्यास तयार आहोत अशी लोकांची मानसिकता त्यांच्या या कार्याने झाली आहे. कोरोना विरुद्ध लढाईत लसीकरण करणे हाच रामबाण उपाय आहे .शेतातील कामे बाजूला ठेवून लसीकरणाबाबत असणारे गैरसमज दूर सारून, लोकांनी लसीकरण करावे असे आवाहन पोलीस पाटील महादेव नरवडे यांनी नागरिकांना केले आहे. या कामी सामाजिक कार्यकर्ते कुबेर नरवडे, विनोद चव्हाण, धनाजी पाटील, विजयकुमार जाधव, भीमराव जाधव, मंगेश जाधव, परवेझ शेख व ग्रामसुरक्षा दल यांनी या मोलाचे सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top