ग्रामीण रुग्णालय सास्तूर स्पर्शच्या फिरत्या वैद्यकीय पथकामुळे ग्रामीण आरोग्याला बळकटी - डॉ. श्री. विजयकुमार फड.
लोहारा / प्रतिनिधी
राष्ट्रीय आरोय अभियान अंतर्गत प्राईड इंडिया स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तुरच्या साकार्याने चालवल्या जाणार्या फिरत्या आरोग्य पथकामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याला बळकटी प्राप्त झाली आहे असे उदगार जिल्हा परिषद उस्मानाबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विजयकुमार फड यांनी काढले.
फनेपूर ता. लोहारा जि. उस्मानाबाद येथे काल दि. १८/०५/२०२१ रोजी मा आमदार श्री ज्ञानराज चौगुले, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री डॉ. विजयकुमार फड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ श्री हनमंत वडगावे, लोहारा तालुका आरोग्य अधिकारी डॉ श्री अशोक कटारे, डॉ किरण गरड,गट विकास अधिकारी ए एस अकेले, ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तूर चे प्रकल्प अधिकारी श्री रमाकांत जोशी, डॉ. सुनिता चक्करवार ग्रामसेवक श्री गोरे ए बी, फनेपुरचे सरपंच सौ. तहेराबी मुल्ला इ. मान्यवरांनी फिरत्या वैद्यकीय पथकाला भेट देऊन पाहणी केली. स्पर्श ग्रामीण रूग्णालयाच्या फिरत्या वैद्यकीय पथका मार्फत दिल्या जाणार्या दर्जेदार आरोग्य सेवेबद्दल मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूरच्या सहकार्याने गेल्या दहा वर्षपासून उस्मानाबाद जिल्ह्यातील दुर्गम अशा ५४ गावांमध्ये या फिरत्या वैद्यकीय पथकाद्वारे दर्जेदार आरोग्य सेवा पुरवली जाते. ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, वृद्ध आर्थिक दृष्ट्या दुर्बल जनतेचा वेळ, पैसा वाचवा. गरोदरमातांची प्रसूतीपूर्व सेवा, प्रसूतीपाश्चात तपासणी त्यांच्या गावात व्हावी त्यांना त्रास होऊ नये बालके व किशोर वयीन मुलांची तपासणी व उपचार रक्तदान, मधुमेह, कुष्ठरोग इ. तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने महिलांची गर्भाशयाच्या कॅन्सर विषयक तपासणी, रक्त लाघवी तपासणी इ मोफत सेवा दिल्या जात्तात.
फिरत्या वैद्यकीय पथकाच्या दैनंदिन कामकाजा बद्दल प्रकल्प अधिकारी श्री रमाकांत जोशी यांनी मान्यवरांनी माहिती दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विजयकुमार फड सरांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हनमंत वडगावे सरांच्या मार्गदर्शनानुसार गावपातळीवरच कोरोनासंबंधीत रँपिड एन्टीजन टेस्ट मोबाईल मेडिकल युनिट मार्फत सुरु करण्यात आली गावपातळीवरच सदर सुविधा उपलब्ध झाल्यामुळे संवशयित लोकांची कोरोना तपासणी लवकर घेऊन जर रुग्ण Positive आला तर ताबडतोब उपचाराला सुरूवात झाली त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व लवकर निदांनामुळे मृत्यूदर कमी करण्यासाठी मदत झाली. सर्व सरपंचांनि याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोय अधिकारी व स्पर्श मोबाईल मेडिकल युनिटचे आभार मानले
मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी झाडे लावण्यासाठी जनजागृती करून गावाच्या लोकसंख्येनुसार प्रत्येक व्यक्तीने ३ ते ४ झाडे लावावीत व यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. तसेच पुढील काळात मोबाईल मेडिकल युनिटद्वारे कोरोना लसीकरण मोहीम चालू करण्याबाबत सूचना केली जेणेकरून प्रत्येक गावात १०० टक्के लसीकरण करूनगाव कोरोनामुक्त होईल असा मानस व्यक्त केला. तसेच कोरोन या आजाराबद्दल जनजागृती व प्रबोधन करण्याचे काम या मोबाईल मेडिकल युनिटमधील डॉक्टरांना व कर्मचारी करीत आहेत पॉझिटिव्ह किवा त्रीव्र आजार असणाऱ्या व्यक्तींना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे संदर्भ सेवेसाठी पाठवण्यात येते. अशी माहिती श्री रमाकांत जोशी यांनी दिली.
ग्रामीण भागातील जनतेसाठी हे मोबाईल मेडिकल युनिट देवदूता प्रमाणे कार्य करीत आहे. ग्रामीण जनतेने त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार श्री ज्ञानराज चौगुले यांनी केले.