नागरिकांनी सहकार्य केले तरच प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येणार- पोलिस अधीक्षक राजतीलक रोशन
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा पोलिसांची टीम तसेच आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाची टीम सगळे मिळून कोरोनाचा प्रसार कसा रोखता येईल यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांचे यात सहकार्य महत्वाचे आहे. नागरिकांनी स्वतःहून सरकारच्या निर्देशांचे पालन करावे तेव्हाच प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येईल. जे नियम न पाळता दुकाने सुरू ठेवतात अशा अनेकजणांची दुकाने सील करण्यात आली आहेत.मात्र अनेक जण अजूनही छुप्या पद्धतीने दुकाने सुरू ठेवत आहेत. नागरिकांनी असे करू नये. यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. कोण कोरोना संक्रमित आहे हे ओळखणे कठीण असल्याने लोकांनी काळजी घ्यावी असे आव्हान उस्मानाबाद जिल्हा पोलिस अधीक्षक राजतीलक रोशन यांनी केले आहे.