Osmanabad : येडशी येथे 15 मे पर्यंत जनता कर्फ्यु !
उस्मानाबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे दिनांक 28 एप्रिल ते 05 मे या दरम्यान जनता कर्फ्यु पाळण्यात आले होते. कडकडीत बंद पाळल्याने गावातील वाढत्या कोरोना पेशंटच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली आहे. त्या कारणाने येडशीचे ग्रामपंचायतच्या वतीने 06 मे व 07 मे या दोन्ही दिवशी 07 ते 11 या वेळेत किराणा व जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून घेण्याचे आवाहन येडशी गावातील नागरिकांना करण्यात आले आहे.
तसेच यानंतर परत 08 मे ते 15 मे या कालावधीत येडशी गावात पुन्हा जनता कर्फ्यु पाळण्यात येणार असून वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद राहणार असल्याचे देखील ग्रामपंचायतीने जाहीर प्रगटन द्वारे जाहीर केले आहे.