Osmanabad जिल्ह्यात 2 ठिकाणी चोरी गुन्हा दाखल

0


Osmanabad जिल्ह्यात 2 ठिकाणी चोरी गुन्हा दाखल

कळंब: निखील भारत भडंगे, रा. कल्पना नगर, कळंब यांनी हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एस 2678 ही दि. 12.04.2021 रोजी 14.30 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर लावली असता ती मो.सा. त्यांना19.00 वा. सु. लावलेल्या ठिकाणी न आढळल्याने ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या निखील भडंगे यांनी दि. 30 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत कळंब पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला आहे.

 

परंडा: परंडा तालुक्यातील रोसा शिवारातील रोसा- भोत्रा रस्त्यालगतच्या गट क्र. 1 मधील शासकीय मालकीचा 60 ब्रास मुरुम अज्ञात व्यक्तीने दि. 01.03.2021 रोजी 11.00 वा. चे पुर्वी चोरुन नेला आहे. यावरुन तलाठी- आकाश नागोराव वानखेडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 सह महाराष्ट्र जमीन महसुल कायदा कलम- 48 (7) (8) अंतर्गत परंडा पोलीस ठाणे मध्ये गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top