Osmanabad जिल्ह्यात 3 ठिकाणी मारहाण गुन्हा दाखल

0


Osmanabad जिल्ह्यात 3 ठिकाणी मारहाण गुन्हा दाखल 

 परंडा : घारगाव, ता. परंडा येथील प्रकाश भैरु लटके यांसह 4 कुटूंबीय व विशाल गणपती लटके यांसह 4 कुटूंबीय अशा दोन्ही कुटूंबाचा दि. 30.04.2021 रोजी रोजी 07.45 वा. सु. राहत्या गल्लीत पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन वाद झाला. यात दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी परस्परविरोधी कुटूंबीयांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, तलवार, कुऱ्हाड, काठीने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या प्रकाश लटके व विशाल लटके यांनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 452, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149  सह शस्त्र अधिनियम कलम- 4, 25 अंतर्गत परडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवले आहेत.

 

ढोकी: तेर, ता. उस्मानाबाद येथील महादेव व मछिंद्र महादेव भक्ते हे दोघे पिता- पुत्र दि. 25.04.2021 रोजी 13.00 शेतातील सामाईक बांध फोडत होते. यावेळी शेजारील शेतकरी- गोरख परसराम हेगडकर यांनी त्यांना शेत मोजुन घेतल्यास बांध फोडण्यास सांगीतले. यावर चिडुन जाउन नमूद दोघा पिता- पुत्रांनी गोरख यांसह त्यांची पत्नी- वनीता यांना शिवीगाळ करुन दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या गोरख  हेगडकर यांनी 30 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

 

तामलवाडी: पुर्वीच्या भांडण- तक्रारीवरुन देवकुरुळी, ता. तुळजापूर येथील सविता व सागर जाधव या दोघांनी दि. 29.04.2021 रोजी 19.00 वा. सु. गावातील ग्रामपंचायत समोर गावकरी- दत्तात्रय श्रीरंग जाधव यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, विळ्याने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या दत्तात्रय जाधव यांनी 30 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत तामलवाडी पोोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

                                              

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top