कळंब - लॉकडाऊन मध्ये घरात बसून राहणे मोठ्यांसाठी सुद्धा आव्हान असताना, कोरोणामुळे ग्रस्त असलेल्या चिमुकल्यांना त्यांच्या घरापासून दूर, रोजच्या सहवासातील व्यक्ती पासून लांब, कोरोना सेंटरमध्ये राहावे लागत आहे. अशा बालकांसाठी आपणही काहीतरी केलं पाहिजे असे मत डॉ.ऋषिकेश भवर यांनी व्यक्त केले.
दि.३१ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील युवक सहकार्यांनी कळंबच्या आयटीआय महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये ॲडमिट असलेल्या लहान मुलांना भेटवस्तू दिली. यातील सकारात्मक बाब आशी की अतिशय लहान वयात त्यांची इतर तालुक्यातील गावातून आलेल्या मुलांशी घट्ट मैत्री झालेली दिसून आली. वयाने लहान असल्यामुळे त्यांच्या निरागस चेहऱ्यावर कसल्याही प्रकारची भीती/चिंता/काळजी वगैरे असण्याचा प्रश्नच नव्हता, सर्वांचे आरोग्य उत्तम. शिवाय तिथे पुर्णवेळ उपलब्ध असणारे डॉ.रुपेश चव्हाण व त्यांच्या टीममधील डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स त्यांची अतिशय प्रेमाने काळजी घेतना दिसून आले.
यावेळी वक्ता प्रशिक्षण विभागाचे उपप्रदेशाध्यक्ष प्रा.तुषार वाघमारे, रोहित दादा पवार विचारमंच जिल्हाध्यक्ष अशोक जगताप,युवकचे उपशहराध्यक्ष अजय जाधव,सम्राट ग्रुप उपाध्यक्ष सौरभ मुंडे, सचिव मनोज शिंदे आदींच्या हस्ते मुलांच्या मनोरंजनासाठी ड्रॉईंग बुक व पेंटिंग चे साहित्य भेट दिले.