पत्रकार मंगेश सोनटक्के यांच्या मातोश्री रुक्मिणी सोनटक्के यांचे निधन

0

पत्रकार मंगेश सोनटक्के यांच्या मातोश्री रुक्मिणी सोनटक्के यांचे निधन

लोहारा - (दि. 1 जून 2021) - पत्रकार मंगेश सोनटक्के यांच्या आई रुक्मिणी मारुती सोनटक्के यांचे कोरोनामुळे रविवारी (दि. 30मे) निधन झाले. त्या 58 वर्षांच्या होत्या. 

पिंपरी चिंचवड येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कोरोना नियमांचे पालन करून स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्यावर पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. 

त्यांच्या पाठीमागे पती, दोन मुले, एक मुलगी व नातवंडे असा मोठा परिवार होता. चौफेर महाराष्ट्र न्यूजचे संपादक मंगेश सोनटक्के यांच्या त्या आई होत्या.

रुक्मिणी सोनटक्के या लोहऱ्यातील प्रतिष्ठित माजी गिरदावर कै. मधुकर लांडगे यांची मुलगी, नगरसेवक पौर्णिमा लांडगे यांची मावशी तर विजय लांडगे, प्रशांत लांडगे, तलाठी जगदीश लांडगे यांच्या बहीण होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top