तुळजापूर तालुक्यातील तिर्थ खुर्द येथे स्वयं शिक्षण प्रयोग उस्मानाबाद यांच्या वतीने किराणा किटचे वाटप

0
तुळजापूर तालुक्यातील तिर्थ खुर्द येथे स्वयं शिक्षण प्रयोग उस्मानाबाद यांच्या वतीने किराणा किटचे वाटप

तुळजापूर :- आज दिनांक 31/5/2021 तुळजापूर तालुक्यातील तिर्थ खुर्द गावामध्ये स्वयं शिक्षण प्रयोग उस्मानाबाद , प्रमोथिनी व रोहिणी नीलेकानी यांच्या संयुक्त विद्यमानाने तिर्थ खुर्द गावांमध्ये लक्ष्मी दूध संकलन केंद्र या ठिकाणी नियमीत व चांगल्या प्रतीचे दूध घालणाऱ्या काही विधवा परितक्ता महिला, अल्पभूधारक तसेच स्वतः घर चालवणाऱ्या महिला यांना घरामध्ये आवश्यक असलेल्या काही किराणा वस्तूंचे एक किट बनवून ते त्या महिलांना वाटप करण्यात आले यासाठी मंगरूळ PHC च्या कर्मचारी दूधभाते मॅडम यांच्या हस्ते तिर्थ खुर्द गावातील 20 महिलांना हे किट वाटप करण्यात आले. अशा पडत्या काळामध्ये मिळालेला आधार घेताना महिलांनी स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या संचालक प्रेमा गोपालन , डायरेक्टर उपमन्यु पाटील सर तबसुम मॅडम व सर्व प्रमोथिनी कंपनीचे आभार व्यक्त केले.
यासाठी तिर्थ खुर्द गावातील लक्ष्मी दूध संकलन केंद्राच्या चालक सुरेखाताई कानडे, स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेचा लीडर कोमल पवार, व स्वयं शिक्षण प्रयोग च्या तुळजापूर तालुका समन्वयक रोहिणी घोडके उपस्थित होत्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top