शिवसेना नेते प्रविण कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

0
उस्मानाबाद दि.१९ (प्रतिनिधी) - 
शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनाचे औचित साधून शिवसेना नेते प्रवीण कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा प्रमुख तथा आ. कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते दि.१९ जून रोजी करण्यात आले. 

यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख बालाजी उर्फ राजाभाऊ पवार, माजी तालुका प्रमुख दिलीप जावळे, कक्ष जिल्हाप्रमुख मोईन पठाण, भीमाअण्णा जाधव, तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रवी कोरे, एच.एम. देवकते आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना नेते कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आल्यामुळे शहरातील शिवसैनिक व जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी या माध्यमातून मदत होणार आहे. कोकाटे यांनी आजपर्यंत गोरगरीबांसह सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी प्रश्न मांडून ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. हे संपर्क कार्यालय झाल्यामुळे अनेकांच्या अडचणी सोडविण्यासाठी या माध्यमातून आणखी जोमाने प्रयत्न करण्यात येणार आहेत. शहरातील जनतेने आपल्या अडीअडचणी उद्भवल्यास या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top