सामाजिक कार्यकर्ते सचिन सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली मोफत जेसीबी मशीन
लोहारा / प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील हराळी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन सूर्यवंशी यांच्या माध्यमातून हराळी गावातील गत वर्षे फुटलेल्या बांध बंधीस्ती व ओढा रुंदीकरण करण्यासाठी पुढाकार घेऊन jcb मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी डीझेल ची व्यवस्था करत आहेत व सचिन सुर्यवंशी हराळी यांच्या मोफत jcb मार्फत हराळी परिसरात जलसंधारणाची कामे केली जात आहेत. एकूणच सध्याच्या पर्जन्यमानाची अनियमितता व अनिश्चितता या कारणांमुळे कमी वेळेत जास्त तीव्रतेचा पाऊस हा पडत आहे. त्यामुळे बांध फुटून पाणी ही वाहून जात आहे व जमिनीची सुपीकता ही कमी होत आहे. माती वाहून जात आहे. या सर्व कारणांमुळे बांध बंधीस्ती होणे आवश्यक आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून या विषयी जागृत करण्याचे काम ज्ञान प्रबोधिनी संस्था हराळी, ता.लोहारा यांच्या माध्यमातून चालू आहे. याचाच परिणाम स्वइच्छेने शेतकरी लोकसहभागातून जलसंधारणाची कामे केली जात आहेत. परिसरात या बाबत माहिती मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. तसेच परिसरातील शेतकऱ्यांकडून सामाजिक कार्यकर्ते सचिन सुर्यवंशी यांचे कौतुक केले जात आहे.