उस्मानाबाद शहरातील सर्व दोन नंबर अवैद्य धंदे बंद करण्याबाबत शिवसेनेच्या वतीने निवेदन

0


 उस्मानाबाद शहरात मोठ्या प्रमाणात दोन नंबर धंदे चालू असून यात मटका , जुगार , दोन नंबर ऑनलाईन लॉटरी तिला कोणतीही शासन मान्यता नसताना शहरात सर्वत्र परवाना नसताना विना परवाना चालू आहे . व यामुळे गोर - गरीब लोकांचे संसार उध्वस्त होत आहेत . तसेच कॉइनचा जुगार ही तेजीत चालू आहे हा व्यवसाय करणाऱ्या लोकांवर कुणाचाही अंकुश नाही त्यामुळे असा व्यवसाय करणारे राजरोजपणे खुल्लम खुला व्यवसाय करत आहेत . तरी या संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करावी या मागणी साठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आहे याची दखल नाही घेतली तर शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय उर्फ पप्पू मुंडे,दिलीप जावळे,पंकज पाटील,तुषार निंबाळकर,राजाभाऊ पवार,विजय ढोणे,बंडू आदरकर,बाळासाहेब शिनगारे,सचिन शिंदे,भीमराव भालेकर आदी,उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top