मा. विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते उल्लेखनिय कार्य करणाऱ्या पोलीसांचा सत्कार

0

पोलीस मुख्यालय: औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. श्री. के. एम. प्रसन्ना यांनी आज दि. 19 जून रोजी उस्मानाबाद पोलीस मुख्यालयास भेट दिली. पोलीस जवान व कुटूंबीयांसाठी पोलीस मुख्यालयात ‘बास्केटबॉल - टेनिस’ या दोन्ही खेळांचे एकत्रीत असे कृत्रीम मैदान (कोर्ट) बांधण्यात आले असुन त्याचे उद्घाटन या प्रसंगी मा. वि.पो. महानिरीक्षक साहेबांच्या हस्ते करण्यात आले.



            जिल्हा पोलीस दलातील 1)इंदु समींद्रे 2)बाबासाहेब कांबळे 3)अमोल बनसोडे 4)बिभिषन कुंभार 5)जाकीर काझी 6)शिवाजी गवळी 7)शौकत पठान 8)सतिश घोळवे 9)शोभा बांगर 10)मुकूंदराज गिरी 11)विठ्ठल चौधरी 12)शिवलींग घोळसगाव 13)संतोष पवार 14)दाजीबा गव्हाळे 15)प्रदीप जगताप 16)जुबेर काझी 17)गजेंद्र गुंजकर 18)ज्योती गीरी 19)अविनाश जाधव 20)अमोल चव्हाण 21)संजय पानसे 22)संजय पाटील 23)आरती ढवारे 24)राहुल घुटे 25)अभिजीत कंदले 26)सविता रासने यांनी गुन्हे तपास, बेपत्ता शोध, फरारी आरोपी अटक, तांत्रीक विश्लेषन करणे अशा स्वरुपाचे उल्लेखनिय कार्य केले होते. त्याबद्दल मा. वि. पो. महानिरीक्षकांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देउन त्यांचा सत्कार करण्यात आला. “पोलीस कॉन्स्टेबल ते सहायक पोलीस उपनिरीक्षक यांची पोलीस दलात 93 % संख्या असुन तुम्ही पोलीस दलाचा कणा आहात. जनमाणसात पोलीसांची प्रतिमा निर्माण करण्यात तुमचा मोलाचा सहभाग आहे. तुम्ही असेच प्रभावी कार्य करुन पोलीस दलाचे नाव उंचवावे.” असे सांगुण मा. पोलीस महानिरीक्षकांनी त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे यांसह जिल्हा पोलीस दलातील अधिकारी- अंमलदार उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top