उपचारादरम्यान रुग्णालयातून पलायन करणाऱ्या कोविड रुग्णावर गुन्हा दाखल

0


 तुळजापूर: -उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर येथे उपचार घेत असलेले कोविड रुग्ण दत्ता टकले, वय 60 वर्षे, रा. कुनसावळी, ता. तुळजापूर हे दि. 05 जून रोजी रात्री 10.00 वा. रुग्णालयातून परस्पर निघून गेले. अशा प्रकारे त्यांनी कोरोना संसर्गाची शक्यता निर्माण होईल अशी निष्काळजीपणाची कृती केली. यावरुन वैद्यकीय अधिकारी- श्रीमती तेजस्विनी सोनवने यांनी दि. 06 जून रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269, 270 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top